Eating Banana Benefits : केळी लोकांच्या सगळ्यात जास्त आवडत्या फळापैकी एक असतात. कारण यांची टेस्ट तर भारी असतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. रोज जर दोन केळी खाल्लीत तर पोट तर भरतंच, सोबतच शरीराला भरपूर पोषणही मिळू शकतं. रोज दोन केळी खाल्ल्यानं शरीरात काय बदल होतील याबाबत एका रिसर्चमधून महत्वाचा खुलासा झाला आहे. तोच जाणून घेऊ...
नॅशनल लायब्ररी ऑफि मेडिसीनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, केळींमध्ये फेनोलिक अॅसिड आणि फ्लेवोनॉइडसारखे बायोअॅक्टिव तत्व भरपूर असतात. ज्यामुळे अनेक फायदे मिळतात. या तत्वांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-रेडिकल गुण असतात, जे शरीराचा ऑक्सीडेटिव स्ट्रेसपासून बचाव करतात.
केळीतील काही फेनोलिक्स अॅंटी-वायरल, अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-डायबिटिक आणि अॅंटी-कॅन्सर इफेक्ट्स दाखवतात. त्याशिवाय हे तत्व एडिमा, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि कॅन्सरसाठी जबाबदार एंझाइम्सना रोखतात.
हृदयासाठी फायदेशीर
पोटॅशिअम हृदयासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जे केळ्यात भरपूर प्रमाणात असतं. हे महत्वाचं मिनरल तुमचं ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यास मदत करतं. जेणेकरून हृदयाला जास्त मेहनत करावी लागू नये. जर तुमचं हृदय शांत राहिलं तर तुम्हाला जास्त फ्रेश आणि एनर्जेटिक वाटू लागेल.
स्मोकिंग सोडण्यास मदत
अनेक प्रयत्न करूनही तुमची स्मोकिंगची सवय सुटत नसेल तर यात केळी तुमची मदत करू शकतात. यातील व्हिटामिन आणि मिनरल्सचं मिश्रण निकोटीनची क्रेविंग कमी करण्यास मदत करू शकतं.
एनर्जी वाढवतात
जर तुम्हाला लगेच एनर्जी हवी असेल तर तुम्ही केळी खाऊ शकता. कारण यात नॅचरल शुगर असते. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्येशिवाय स्टेबल एनर्जी मिळू शकेल.
मूड चांगला होईल
तुम्ही नेहमीच स्ट्रेसमध्ये असता किंवा निराशा वाटत असेल तर केळी खाऊ शकता. यातील व्हिटामिन बी६ मेंदूला चांगले केमिकल जसे की, सेराटोनिन आणि डोपामाइन रिलीज करण्यास मदत करतात. तुम्ही कितीही बिझी असाल तर केळी तुम्हाला शांत ठेवण्यास मदत करतात.
अॅनिमिया होईल दूर
जर तुम्हाला नेहमीच थकवा जाणवत असेल, तर याचं कारण आयर्नची कमतरता असू शकतं. केळ्यात आयर्न असतं, जे शरीराला जास्त लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं.