Join us

१४ दिवस रोज मध खाल्ल्यानं शरीरावर काय प्रभाव पडेल? डॉक्टरांनी सांगितले एकापेक्षा एक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:34 IST

Honey Benefits : डॉक्टर सेठी यांनी त्यांच्या व्हिडिओत सांगितलं आहे की, जर कुणी १४ दिवस रोज मध खातील तर त्यांच्या शरीरावर कसा प्रभाव पडेल. 

Honey Benefits : मध आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. मधातील औषधी गुणांमुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या उपचारांमध्ये मधाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. मधात अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. अशात १४ दिवस मध खाल्ल्यास शरीरावर काय प्रभाव पडतो, हे सांगणार एक व्हिडीओ एम्स, हार्वर्ड, स्टॅनफोर्डमध्ये ट्रेनिंग घेतलेले आणि साधारण २० वर्षांपासून प्रॅक्टिस करणारे डॉक्टर सेठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

डॉ. सौरभ सेठी कॅलिफोर्नियामध्ये गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट आहेत. त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ केलं आहे. डॉक्टर सेठी यांनी त्यांच्या व्हिडिओत सांगितलं आहे की, जर कुणी १४ दिवस रोज मध खातील तर त्यांच्या शरीरावर कसा प्रभाव पडेल. 

डॉ. सेठी व्हिडिओत म्हणाले की, 'जर तुम्ही १४ दिवस रोज मध खाल तर शरीराला अनेक फायदे मिळतील, ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल. मधात १५० पेक्षा जास्त वेगवेगळे तत्व असतात. ज्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमीनो अ‍ॅसिड यांचा समावेश आहे. हे सगळे पोषक तत्व साखरेपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासोबतच इम्यूनिटी बूस्ट करतात'.

ते पुढे म्हणाले की, 'जर नियमितपणे मध खाल्लं तर हेल्दी बॅक्टेरिया वाढून आतड्यांचं आरोग्य चांगलं करण्यास मदत मिळते. तसेच यानं ऑक्सीडेटीव स्ट्रेस कमी करून लिव्हरचं आरोग्य सुधारण्यासही मदत मिळते'.

डॉ. सेठी म्हणाले की, 'जर रात्री थोड्या प्रमाणात मध खाल्लं तर मेलाटोनिन हार्मोन्स रिलीज होऊन तुमची झोप चांगली होण्यास मदत मिळते. कच्च मध खाणं सगळ्यात चांगली पद्धत आहे. कारण मध गरम केल्यावर त्यातील पोषक तत्व नष्ट होतात'. 

मध खाण्याचे इतर फायदे

इम्यूनिटी वाढेल

रोज मध खाल्ल्यानं कमजोर झालेली इम्यूनिटी मजबूत होते. सोबतच सर्दी-पडसा यासारख्या समस्या दूर होतात. रात्री जर तुम्ही झोप येत नसेल तर १ चमचा मध खा. तुम्हाला चांगली झोप येईल.

पचन तंत्र होईल मजबूत

जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर रोज थोडं मध चाखा. यानं पचन तंत्र तर मजबूत होईलच, सोबतच पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतील.

वजन कमी होईल

जर तुम्हाला तुमचा लठ्ठपणा कमी करून वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यात एक चमका मध टाकून प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स