Join us
Daily Top 2Weekly Top 5

आराध्या बच्चन शाळेच्या डब्यात कोणते पदार्थ नेते? शेफ संजीव कपूर यांनी ठरवलाय मेन्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:43 IST

आराध्या बच्चन डब्याला नेमकं काय घेऊन जाते ते पाहूया.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी कन्या आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) ही कायम चर्चेत असते.  आराध्या बच्चन ही खूपच लग्जरीअस आयुष्य जगते. आराध्या बच्चन स्कूल टिफिनमध्ये काय नेते. तिच्या डब्यात काय असते असा प्रश्न अनेकांना पडतो. आराध्या बच्चन डब्याला नेमकं काय घेऊन जाते ते पाहूया.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलबाबत तुम्ही खूपदा ऐकलं असेल. बऱ्याच सेलिब्रिटीजची मुलं याच शाळेत शिकतात. ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्या बच्चनसुद्धा याच शाळेत शिकते. शाळेत फक्त अभ्यासासाठीच नाही तर आपल्या लग्नजरीअस लाईफस्टाईलसाठी आणि क्वालिटीसाठीसुद्धा ती प्रसिद्ध आहे. (What Does Aaradhya Bachchan Eat For Lunch At School Sanjeev Kapoor Designes The Menu Know Here)

या शाळेत मुलांच्या आरोग्याकडे फार लक्ष दिले जाते. या शाळेतील फूड मेन्यू हा खूपच आकर्षक असतो.एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलप्रमाणे हा मेन्यू तयार केला जातो. मुलांना घरून टिफीन न्यावा लागत नाही. त्यांना शाळेत  नाश्ता-जेवण सर्व काही मिळतं.

शेफ संजीव कपूर यांनी ठरवलेला हा मेन्यू असतो

शाळेत पूर्णपणे व्हेजिटेरियन आणि पौष्टीक मेन्यू दिला जातो.असं मानलं जातं की या शाळेत दोन एअरकंडीशन डायनिंग हॉल्स आहेत. ज्यात अधुनिक कॅटरींग स्टँडर्ड्ससह अन्न वाढले जाते. लहान मुलांसाठी हा मेन्यु सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी डिझाईन केला आहे.

सकाळी नाश्त्याला काय असते?

यात मुलांना हेल्दी तसंच चवदार अन्न दिलं जातं. जंक फूड अजिबात दिलं जात नाही. साऊथ इंडियन पदार्थ जसं की इडली, डोसा, उत्तपम हे पदार्थ असतात. पोहे, ताजी फळं, ड्राय फ्रुट्स हे सर्व मिळून हेल्दी नाश्ता वाढला जातो. आराध्या बच्चनसुद्धा या पद्धतीच्या नाश्त्यानं दिवसाची सुरूवात करते.

दुपारच्या जेवणात काय असते?

दुपारचं जेवण साधं पण रॉयल असते. दुपारच्या जेवणात महत्वाचा फोकस साध्या पण हाय क्वालिटी अन्नावर असतो. यात विविध प्रकारच्या डाळी, सिजनल भाज्या, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती-सॅलेड यांचा समावेश असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Aaradhya Bachchan's school lunch menu designed by Chef Sanjeev Kapoor.

Web Summary : Aaradhya Bachchan attends Dhirubhai Ambani International School, known for its luxurious lifestyle and quality education. The school provides a nutritious, vegetarian menu designed by Chef Sanjeev Kapoor, featuring South Indian dishes for breakfast and diverse, high-quality meals for lunch, focusing on simple, healthy food.
टॅग्स :सोशल मीडियाऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन