Join us

पिझ्झ्याचे पार वाटोळे केले! पिझ्झ्यावर टरबूज घालून कोण खातं असा टरबूज पिझ्झा, पहा व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2022 13:16 IST

Pizza With Watermelon Base: पिझ्झा म्हणजे कसा स्वादिष्ट, तिखट, चटपटीत हवा असतो... आता हे बघा इथे काय केलंय... टरबुजाचा चक्क पिझ्झा (watermelon pizza), हा विचित्र प्रयोग एकदा बघाच.

ठळक मुद्देतब्बल ६० लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अशा विचित्र पद्धतीने केलेला पिझ्झा बघून पिझ्झा लव्हर्स चांगलेच हादरून गेले आहेत.

पिझ्झा हा असा एक पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. आता पिझ्झा म्हणताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो मैद्याचा बेस असणारा पिझ्झा (Pizza lovers). किंवा आता गव्हाच्या पीठाचाही बेस काही ठिकाणी मिळतो. त्या पिझ्झावर मस्त वेगवेगळ्या चवीचे सॉस, चीज आणि आवडीच्या भाज्यांचं टॉपिंग केलेलं असतं. असा पिझ्झा समोर आला की कुणालाही खावा वाटतो. पण इथे मात्र सगळाच घोळ घालून ठेवला आहे (Weird Food Combinations). चक्क टरबुजाचा बेस वापरून पिझ्झा केलाय...(watermelon pizza)

 

खाद्यपदार्थांसोबत केलेले वेगवेगळे प्रयोग नेहमीच सोशल मिडियावर एक चर्चेचा विषय होत असतात. कधी कधी हे प्रयोग इतक्या विचित्र पद्धतीने केले जातात की असे पदार्थ कोण खात असेल, असं वाटून जातं. कधी मॅगीत आईस्क्रिम टाकलं जातं तर कधी गुलाबजामचे पराठे लाटले जातात. आता याच पंक्तीत बसणारा आणखी एक प्रयोग म्हणजे टरबुजाचा पिझ्झा. सोशल मिडियावर हा प्रयोग सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 9gag या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तब्बल ६० लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अशा विचित्र पद्धतीने केलेला पिझ्झा बघून पिझ्झा लव्हर्स चांगलेच हादरून गेले आहेत.

 

कसा केला टरबूज पिझ्झा?- टरबूज पिझ्झा करण्यासाठी त्या शेफने सगळ्यात आधी टरबुजाची फोड गोलाकार कापली.- त्यानंतर त्याने ती तव्यावर टाकून ५- ५ मिनिटे दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घेतली.- या फोडीवर मग त्याने पिझ्झा सॉस, टाेमॅटो सॉस आणि आणखी काही वेगवेगळे सॉस टाकले.- त्यावर चीझ पसरवून टाकलं.- या टरबूज पिझ्झाचं टॅपिंग करण्यासाठी त्याने टरबुजाचेच छोटे छोटे तुकडे वापरले.- असा सगळा सेट केलेला पिझ्झा बेस मग बेक करण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवला. - बेक झाल्यानंतर नेहमीचा पिझ्झा जसा आपण त्रिकोणी आकारात कापतो तसा कापला आणि खवय्यांना खायला दिला. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती