Join us  

वडापाव- मसाला पाव नेहमीचाच, आता घ्या आईस्क्रिम पाव, गरमागरम पावमध्ये थंडगार आईस्क्रिम- रेसिपी व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2024 3:29 PM

Viral Recipe Of Ice Cream Pav: आईस्क्रिम पाव नावाचा पदार्थ असतो, हे ऐकूनच अनेक खाद्यप्रेमी चिडले आहेत. बघा नेमकी कशी आहे ही व्हायरल रेसिपी.... (How to make ice cream pav)

ठळक मुद्देपाव आणि आईस्क्रिम एकत्र आणून असे कसे भलतेच प्रयोग करतात, असं म्हणत काही खवय्ये राग व्यक्त करत आहेत, तर हा एक कल्पक पदार्थ असून तो खाऊन पाहण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

वडापाव हा बहुतांश लोकांचा आवडीचा पदार्थ. संध्याकाळची वेळ असो, दुपारची असो किंवा मग अगदी सकाळची वेळ असो. थोडी फार भूक लागली असेल, मित्रांसोबत गप्पा मारायच्या असतील किंवा मग स्वस्तात मस्त मिळणारं पण तेवढंच चटकदार असणारं असं काहीतरी खायचं असेल तर अनेकांची पाऊलं थेट वडापावच्या गाड्याकडं वळतात. एवढा हा लोकप्रिय पदार्थ. त्यानंतर पावभाजीच्या भाजीसारखीच भाजी आणि ती पावमध्ये आणि पावच्या वर टाकून देतात तो गरमागरम चटकदार पदार्थ म्हणजे मसाला पाव. हे दोन्ही पदार्थ खवय्यांच्या आवडीचे. पण आता याच लाईनमध्ये चक्क आईस्क्रिम पाव नावाचा पदार्थ येऊन बसू पाहातो आहे. (viral recipe of ice cream pav)

 

आईस्क्रिम आणि पाव हे कॉम्बिनेशनच अनेकांना आवडलेलं नाही. पाव आणि आईस्क्रिम एकत्र आणून असे कसे भलतेच प्रयोग करतात, असं म्हणत काही खवय्ये राग व्यक्त करत आहेत.

भुवया विरळ आहेत? ४ टिप्स- आयब्रोज होतील काळ्याभोर- दाट

तर हा एक कल्पक पदार्थ असून तो खाऊन पाहण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आईस्क्रिम पाव कसा तयार करतात, याची रेसिपी birjuspavbhaji या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये गरमागरम पावमध्ये थंडगार आईस्क्रिम घालून ते खवय्यांना सर्व्ह करण्यात येत आहे. 

 

या व्हिडिओवरून असं दिसून येत आहे की अशा पद्धतीचा हा आईस्क्रिम केक मुंबईमध्ये भिवंडीच्या एका फूड स्टॉलवर १०० रुपयांना मिळतो.

चष्म्यामुळे नाकावर पडलेले काळसर डाग काढून टाकण्याचे ३ उपाय- काही दिवसांतच डाग गायब 

यामध्ये सुरुवातीला त्या शेफने मोठ्या पॅनवर भरपूर बटर टाकून पाव गरम करून घेतले. त्यानंतर त्या गरमागरम झालेल्या बटरपावमध्ये आईस्क्रिमचा एक मोठा स्लाईस टाकला आणि अशा पद्धतीने बनवलेला आईस्क्रिम पाव ग्राहकांना सर्व्ह केला. ही अजब-गजब रेसिपी पाहून 'जो लोग कोरोना से बच गए हैं उनको हार्ट अटैक से मरवाने की तैयारी चल रही हैं',  'its time to leave earth' अशा अनेक गमतीदार कमेंट येत आहेत. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीसोशल व्हायरलइन्स्टाग्राम