Join us

विराट कोहलीला आवडतो 'हा' खास तांदूळ, किंमत ५५० रुपये किलो! वाचा त्या तांदळाची खासियत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 19:06 IST

Virat Kohli Loves To Eat Special Rice From Surat Which Costs 550 Rs Per Kg: विराट कोहलीला आवडत असणाऱ्या एका स्पेशल तांदळाची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूपच रंगली आहे.

ठळक मुद्देविराट कोहलीसारखा व्यक्ती जर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या तांदळाचा भात खात असेल तर ताे तांदूळ नक्की खास असला पाहिजे

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही अतिशय प्रसिद्ध जोडी. हे दोघेही नवरा- बायको आपल्या आहाराच्या बाबतीत किती काटेकोर आहेत हे आपल्याला माहितीच आहे. त्याचं डाएट, व्यायाम हे सगळं ठरलेलं असतं. दोघेही वेगन फूड घेतात. शिवाय दोघेही रात्रीचं जेवण संध्याकाळी ६ च्या आत करतात, हे त्यांच्या चाहत्यांना माहितीच आहे. आता विराट कोहलीबाबत आणखी एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ती आहे तो खात असलेल्या खास तांदळाबद्दल (rice). हेल्थ फ्रिक लोक सहसा तांदळापासून लांब राहाणे पसंत करतात. कारण वजन, रक्तातील साखर वाढविण्यासाठी तांदूळ कारणीभूत ठरतो, असं आपण ऐकत आलो आहोत. पण असं असताना विराट कोहलीसारखा व्यक्ती जर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या तांदळाचा भात खात असेल तर ताे तांदूळ नक्की खास असला पाहिजे. म्हणूनच पाहा तो तांदूळ नेमका कोणता आणि काय त्याची खासियत.. 

 

विराट कोहली नेमका कोणत्या तांदळाचा भात खातो?

सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी व्हायरल झाल्या आहेत, त्यानुसार विराट कोहली जो तांदूळ खातो तो ग्लुटेन फ्री तर आहेच पण कार्ब्स आणि फॅट्स यांचं प्रमाणही त्यात खूप कमी आहे. त्याच्यासाठी खास सूरतहून हा तांदूळ मागवला जातो आणि तो Fortified rice म्हणून ओळखला जातो.

लहान मुलांचे गुडघे खूप काळवंडून गेले? २ सोपे उपाय- काळेपणा जाऊन गुडघे स्वच्छ होतील

FSSAI ने ही हा तांदूळ आरोग्यदायी असल्याचं सांगितलं आहे. हल्ली फोर्टिफाईड फूडचा खूप ट्रेण्ड आहे. आपल्याला नेहमीच्या अन्नपदार्थांमधून जे काही पौष्टिक घटक, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळू शकत नाहीत, ते सगळे पौष्टिक घटक Fortified प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये एकत्रित केलेले असतात.

जॅकी श्रॉफ सांगतो तशा रांगड्या पद्धतीने करा कांदा- भेंडी! चवदार भाजीची एकदम सोपी रेसिपी

त्यामुळे असे फोर्टिफाईड फूड खूप आरोग्यदायी मानले जातात. कारण शरीरातील वेगवेगळ्या घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरतात. शिवाय हा भात पचायलाही खूप हलका असतो. 

 

बहुतांश महिलांच्या शरीरात कॅल्शियम, लोह या घटकांची कमतरता असते. अशा महिलांसाठी फाेर्टिफाईड प्रकारचे अन्न खाणे विशेष उपयुक्त मानले जाते.

पावसाळी हवेमुळे तिखट, मसाल्यांना जाळं लागण्याची भीती? ५ टिप्स, तिखट- मसाले टिकतील वर्षभर

ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींना किंवा आजारातून उठलेल्या व्यक्तीच्या शरीराची झालेली झीज लवकर भरून काढण्यासाठीही हे अन्न उपयुक्त ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अन्न चांगले मानले जाते. म्हणूनच तर विराट कोहलीचा भर Fortified rice खाण्यावर आहे.

 

टॅग्स :अन्नआरोग्यवेट लॉस टिप्सविराट कोहलीअनुष्का शर्मा