Lokmat Sakhi >Food > चहा ब्रेडमध्ये व्हायरल होण्यासारखं काय आहे? पाहा लोक किती वेडे झालेत चहा मलाई टोस्ट ट्रेंडसाठी...

चहा ब्रेडमध्ये व्हायरल होण्यासारखं काय आहे? पाहा लोक किती वेडे झालेत चहा मलाई टोस्ट ट्रेंडसाठी...

viral chai bread toast, see chai malai toast recipe, special tea recipe everyone is addicted to : सध्या इंस्टाग्रावर व्हायरल झालेली रेसिपी तुम्ही केली का? चहाप्रेमींसाठी खास पदार्थ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 17:35 IST2025-07-18T17:33:38+5:302025-07-18T17:35:47+5:30

viral chai bread toast, see chai malai toast recipe, special tea recipe everyone is addicted to : सध्या इंस्टाग्रावर व्हायरल झालेली रेसिपी तुम्ही केली का? चहाप्रेमींसाठी खास पदार्थ.

viral chai bread toast, see chai malai toast recipe, special tea recipe everyone is addicted to. | चहा ब्रेडमध्ये व्हायरल होण्यासारखं काय आहे? पाहा लोक किती वेडे झालेत चहा मलाई टोस्ट ट्रेंडसाठी...

चहा ब्रेडमध्ये व्हायरल होण्यासारखं काय आहे? पाहा लोक किती वेडे झालेत चहा मलाई टोस्ट ट्रेंडसाठी...

इंस्टाग्रामवर सतत काही तरी ट्रेंडींग असतेच. एखादा डान्स व्हिडिओ एखादा प्रँक किंवा चॅलेंज कायम फार प्रसिद्ध होत असते. त्यात अन्नपदार्थांचाही समावेश होतो. जसे लॉकडाऊन चालू असताना डालगोना कॉफीचा ट्रेंड फार गाजला होता. (viral chai bread toast,  see chai malai toast recipe, special tea recipe everyone is addicted to. )जगभरातून घरागरात ही कॉफी केली जात होती. नंतर केक करण्याचा ट्रेंडही फार चालला होता. असे सतत काही तरी ट्रेंड सुरु असतातच. सध्या इंस्टाग्रामवर चहा मलाई टोस्ट हा पदार्थ करुन त्याचे फोटो व्हिडिओ पोस्ट करत आहेत. नाश्त्याला चहा ब्रेड हे आपल्या इथे खाल्ले जातेच. चहा मधे परतलेला खमंग ब्रेड बुडवून खायला छान लागतो. मात्र या ट्रेंडमध्ये ब्रेड चहात बुडवायचा नसून चहाच ब्रेडवर ओतायचा आहे. जसे लहानपणी बटर खायचो अगदी तसेच एकदा जाणून घ्या नक्की काय रेसिपी आहे.  

साहित्य 
ब्रेड, दुधावरची ताजी साय, साखर, बटर, चहा पूड, दूध, वेलची, पाणी

कृती
१. आधी चहा तयार करत ठेवा. त्यासाठी पाणी गरम करा पाण्यात साखर घाला. तसेच चहा पूड घाला. वेलची घाला व्यवस्थित उकळून घ्या. त्यात दूध घाला आणि मग चहा गाळून घ्या. चहा जसा नेहमी करता तसाच करायचा आहे. त्यात काही वेगळे करायचे नाही. 

२. ब्रेडला दोन्ही बाजूनी बटर लावा. तव्यावर थोडे बटर घाला आणि त्यावर ब्रेड परतून घ्या. दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत परतून घ्यायचे. मस्त ब्राऊन होईपर्यंत परतायचे. ब्रेड करपण्याआधीच काढून घ्या आणि थोडा गार होऊ द्या. 

३. ब्रेडवर दुधाची ताजी साय लावायची. भरपूर साय घ्या. ब्रेडवर साय पसरवली की त्यावर साखर घालायची. साखर घालून झाल्यावर वरतून आणखी एक ब्रेडचा तुकडा ठेवायचा आणि सॅण्डविचसारखे तयार करायचे. आता तो ब्रेड पसरट आणि खोलगट ताटलीत ठेवायचा. तयार केलेला चहा गरमागरम त्यावर ओतायचा. सगळा ब्रेड चहामधे बुडायला हवा. त्या बाजूलाही चहा ओतायचा. थोडावेळ तसेच ठेवायचे. ब्रेड चहा शोषून घेतो. मग ब्रेड चमच्याच्या मदतीने खायचा. हा पदार्थ सध्या सगळीकडे फारच प्रसिद्ध आहे. तुम्हीही एकदा नक्की खाऊन पाहा.     

Web Title: viral chai bread toast, see chai malai toast recipe, special tea recipe everyone is addicted to.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.