ओली भेळ म्हणजे भारतीय चटपटीत पदार्थांपैकी एक फारच लोकप्रिय रेसिपी. करायला सोपी आणि खाताना मिळणारा आनंद काही वेगळाच. बंगालमध्ये याच भेळेचा एक प्रकार केला जातो ज्याला झालमुरी असं म्हणतात. (Viral Bengali Jharmuri, see the traditional Bengali recipe, spicy and tasty )करायला फारच सोपी आहे. तसेच चवीला कमाल. पाहा कशी करायची बंगाली झालमुरी.
साहित्य
मुरमुरे, टोमॅटो, कांदा, बटाटा, पांढरे वाटाणे, हिरवी मिरची, काळे चणे, चनाचूर , पुदिना, आलं, कोथिंबीर, नारळ, शेव, आंब्याच्या लोणच्यावरील तेल, शेंगदाणे, मीठ, जिरे, धणे, वेलची, दालचिनी, लिंबू
कृती
१. कांदा बारीक चिरुन घ्यायचा. टोमॅटोही छान बारीक चिरायचा. पांढरे वाटाणे रात्रभर किंवा किमान ४ तासतरी भिजवायचे. काळे चणेही भिजवायचे . कुकरमध्ये लावायचे आणि शिजवून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे अगदी बारीक तुकडे करायचे. ताजा नारळ फोडून घ्यायचा. त्याचे लहान तुकडे करायचे. बटाटे उकडून घ्यायचे. सोलून घ्यायचे आणि त्याचे बारीक तुकडे करायचे.
२. एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. त्यात निवडलेली ताजी कोथिंबीर घालायची. थोडी पुदिन्याची पाने घालायची. थोडं मीठ घाला तसेच आल्याचा तुकडा घालून चमचाभर पाणी घाला. त्याची पेस्ट वाटून घ्या. नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी पातळ करा. जास्तही पातळ नको.
३. शेंगदाणे छान परतून घ्यायचे. कढईत किंवा पॅनमध्ये थोडे जिरे, थोडे धणे, दालचिनीचा तुकडा आणि वेलची भाजून घ्या. दोन पाच मिनिटे भाजा आणि गार करुन त्याचा मसाला वाटून घ्या. पावडर तयार करा. (west bangal)
४. एका खोलगट पातेल्यात मुरमुरे घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच टोमॅटो घालायचा. थोडं चनाचूर घालायचं, भाजलेले शेंगदाणे घालायचे. (street food)बटाट्याचे तुकडे घालायचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालायचे. नारळाचे तुकडे घाला. शिजवलेले काळे चणे घाला. भाजलेले शेंगदाणे घाला. तयार केलेली चटणी घाला. पांढरे वाटाणे घालायचे. लोणच्याचे तेल घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. भरपूर शेव घालायची. लिंबू पिळायचा आणि सगळं मस्त एकजीव करुन घ्यायचं.
Web Summary : Bengali Jhalmuri, a flavorful variation of bhel, is easy to prepare. Combine puffed rice, chopped vegetables, boiled potatoes, chickpeas, and a spicy chutney. Add peanuts, coconut, and a special roasted spice mix for an authentic, tangy street food experience. Garnish generously and enjoy!
Web Summary : बंगाली झालमुरी, भेल का एक स्वादिष्ट रूप, बनाने में आसान है। मुरमुरे, कटी हुई सब्जियां, उबले आलू, छोले और एक मसालेदार चटनी मिलाएं। प्रामाणिक स्वाद के लिए मूंगफली, नारियल और भुने हुए मसालों का मिश्रण डालें और खूब सजाकर आनंद लें!