Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थी: नव्या वर्षातल्या पहिल्याच चतुर्थीसाठी करा कणिक- रव्याचे मोदक, गणरायासाठी खास नैवैद्य

संकष्टी चतुर्थी: नव्या वर्षातल्या पहिल्याच चतुर्थीसाठी करा कणिक- रव्याचे मोदक, गणरायासाठी खास नैवैद्य

Sankashti Chaturthi April 2025 Naivedya: नव्या वर्षातल्या पहिल्याच संकष्टी चतुर्थीनिमित्त गणरायासाठी करा अतिशय सोप्या पद्धतीने रवा आणि कणिक वापरून केलेले खास मोदक.(modak recipe for sankashti Chaturthi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 18:40 IST2025-04-16T12:43:36+5:302025-04-16T18:40:05+5:30

Sankashti Chaturthi April 2025 Naivedya: नव्या वर्षातल्या पहिल्याच संकष्टी चतुर्थीनिमित्त गणरायासाठी करा अतिशय सोप्या पद्धतीने रवा आणि कणिक वापरून केलेले खास मोदक.(modak recipe for sankashti Chaturthi)

vikat sankashti Chaturthi 2025, sankashti Chaturthi April 2025 naivedya, modak recipe for sankashti Chaturthi, how to do modak from wheat atta | संकष्टी चतुर्थी: नव्या वर्षातल्या पहिल्याच चतुर्थीसाठी करा कणिक- रव्याचे मोदक, गणरायासाठी खास नैवैद्य

संकष्टी चतुर्थी: नव्या वर्षातल्या पहिल्याच चतुर्थीसाठी करा कणिक- रव्याचे मोदक, गणरायासाठी खास नैवैद्य

Highlightsबऱ्याच ठिकाणी या मोदकांना तळणीचे मोदक असंही म्हटलं जातं.

संकष्टी चतुर्थीचं व्रत अनेक घरांमध्ये केलं जातं. अगदी घरातले सगळेच सदस्य चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. रात्री चंद्रोदय झाला की गणरायाला मोदकांचा नैवेद्य हमखास दाखवला जातो. मोदकाच्या नैवेद्याशिवाय संकष्टी चतुर्थी नाहीच.. त्यामुळे वर्षातल्या या पहिल्या संकष्टी चतुर्थीसाठी गणपती बाप्पासाठी कणिक आणि रवा वापरून खास मोदक करा. ही रेसिपी अतिशय सोपी आणि खूप पटकन होणारी आहे (sankashti Chaturthi April 2025 naivedya). त्यासाठी विशेष तयारी करण्याचीही गरज नाही (vikat sankashti Chaturthi 2025).. बऱ्याच ठिकाणी या मोदकांना तळणीचे मोदक असंही म्हटलं जातं.(modak recipe for sankashti Chaturthi)

कणिक- रव्याचे मोदक करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी कणिक

अर्धी वाटी रवा

४ टेबलस्पून किसलेलं खोबरं

साबण - डिशवॉश लावून लाकडी चॉपिंग बोर्ड धुणं धोकादायक! तज्ज्ञ सांगतात, बोर्ड स्वच्छ करण्यासाठी.....

३ टेबलस्पून गूळ

१ टीस्पून भाजलेली खसखस

१ टीस्पून वेलची पूड

मोदक तळण्यासाठी तेल

अर्धा कप दूध

 

कृती

रवा आणि कणिक यांचे मोदक करण्यासाठी जाडसर रवा शक्यतो वापरू नका.

खोबरं किसून ते मंद आचेवर थोडंसं भाजून घ्या. तसेच गूळ बारीक करून घ्या.

यानंतर एका भांड्यामध्ये रवा आणि कणिक घ्या. त्यात दूध घाला आणि नंतर जसं लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ छान मळून झाल्यानंतर त्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावा आणि १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.

भारतातील महिलांमध्ये वाढतोय अंडाशयाचा कॅन्सर! काय त्यामागची कारणं- लक्षणं कशी ओळखायची?

तोपर्यंत मोदकामध्ये भरण्याच्या सारणाची तयारी करून घ्या. यासाठी भाजलेलं खोबरं, गूळ, भाजून घेतलेली खसखस, वेलची पूड असं सगळं एका भांड्यात एकत्र करा आणि हातानेच चुरून व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

यानंतर भिजवलेल्या कणकेचे लहान लहान गोळे करा आणि ते पुरीपेक्षा लहान आकाराचे लाटून घ्या. या पुऱ्या खूप पातळ लाटू नयेत. नाहीतर मोदक तळताना फुटून जातात.

पुऱ्यांच्या मधोमध सारण भरा आणि नंतर त्या पुऱ्यांना मोदकाचा आकार द्या. हे मोदक तळताना गॅस मंद किंवा खूप मोठा ठेवू नका. मध्यम आचेवर मोदक छान तळले जातात. अशा पद्धतीने मोदक करून तुम्ही गणपतीला ११ किंवा २१ मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता. 


 

Web Title: vikat sankashti Chaturthi 2025, sankashti Chaturthi April 2025 naivedya, modak recipe for sankashti Chaturthi, how to do modak from wheat atta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.