काही काही पदार्थ असे असतात जे त्या त्या प्रांताची ओळख असतात पण तरीही सगळीकडे मोठ्या आवडीने खाल्ले जातात. आता हेच पाहा ना पाटवडी रस्सा ही विदर्भाची खास रेसिपी. पण अवघ्या महाराष्ट्रात ती मोठ्या चवीने खाल्ली जाते. ती सगळीकडेच तयार होते पण विदर्भाची अस्सल चव तिला नसते. म्हणूनच आता ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा. तोंडाला चव येईल आणि नक्कीच एखादी पोळी जास्तच खाल. घरी पाहूणे येणार असतील तर अशावेळीही तुम्ही पाटवडी रस्सा तयार करू शकता.(vidarbha special patvadi rassa recipe)
रेसिपी
साहित्य
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग
आलं, लसूण पेस्ट
२ मध्यम आकाराचे कांदे आणि ३ ते ४ चमचे किसलेलं खोबरं
खसखस आणि तीळ प्रत्येकी एकेक चमचा
१ वाटी बेसन
चिमूटभर हळद तसेच चवीनुसार तिखट आणि मीठ
३ ते ४ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
पाटवडी रस्सा तयार करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्या. यानंतर त्यात कोथिंबीर, आलं- लसूण पेस्ट घालून थोडं पाणी टाका.
मासिक पाळीतली पोटदुखी थांबविण्यासाठी कोरफड म्हणजे वरदान- 'या' पद्धतीने खा- पोटावरची चरबीही उतरेल..
यानंतर त्यात हळद आणि लाल तिखट घाला. त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर बेसन घाला. वाफ येईपर्यंत बेसन शिजवून घ्या आणि त्यानंतर ते एका ताटलीत काढून त्याच्या वड्या करून घ्या. त्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घाला.
आता रस्सा तयार करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये तेल घालून कांदा, खोबरं, खसखस, तीळ चांगले परतून घ्या. यानंतर ते थंड होऊ द्या आणि नंतर त्यामध्ये काेथिंबीर घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आलं, लसूण पेस्ट परतून घ्या.
५ वर्षांनी तरुण दिसाल! 'या' छोट्या गोष्टी बदलून पाहा, तुम्हाला पाहून सगळेच म्हणतील व्वॉव...
त्यात थोडी हळद घालून तयार केलेलं वाटण घाला. आता या वाटणाला तेल सुटू लागलं की त्यामध्ये गरम पाणी घाला. त्यात गरम मसाला, तिखट, मीठ, धनेपूड, कोथिंबीर घालून उकळी येऊ द्या. झणझणीत रस्सा तयार. आता या रस्सामध्ये बेसन वडी घाला आणि भाकरी, पोळी, भात यासोबत पाटवडी रस्सा खा..
Web Summary : Patwadi Rassa, a Vidarbha specialty, is loved across Maharashtra. This recipe offers an authentic taste. Prepare a spicy curry with gram flour patties, perfect with roti or rice.
Web Summary : पाटवडी रस्सा, विदर्भ की विशेषता, महाराष्ट्र में खूब पसंद किया जाता है। यह रेसिपी एक प्रामाणिक स्वाद प्रदान करती है। बेसन की पैटीज़ के साथ एक मसालेदार करी तैयार करें, जो रोटी या चावल के साथ परिपूर्ण है।