सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे गारेगार पदार्थ आपण अगदी पुरेपूर खातो. एरवी आईस्क्रिम, कुल्फी, बर्फाचा गोळा अससे पदार्थ अगदी बेतानेच खाणारे काही जण उन्हाळ्यात मात्र या थंडगार पदार्थांवर चांगलाच ताव मारतात. काही जणांना तर उन्हाळ्यात रोजच आईस्क्रिम किंवा कुल्फी लागते. आता प्रत्येकवेळी विकतचं आईस्क्रिम आणणं हे थोडं खर्चिक काम.. त्यामुळेच ही रेसिपी पाहा आणि घरीच अगदी स्वस्तात तुम्हाला पाहिजे त्या फ्लेवरचं आईस्क्रिम करून खा (how to make ice cream at home?). हे आईस्क्रिम अगदी विकतसारखं छान सॉफ्ट होईल.(simple and easy recipe of making ice cream)
घरच्याघरी आईस्क्रिम करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी दूध
१ वाटी व्हिप क्रिम
१ टीस्पून कॉर्नफ्लॉवर
स्टिकर्स काढताना नव्या भांड्यावर चिकट- पांढरे डाग राहतात? २ उपाय- काही सेकंदात डाग गायब
कृती
सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये फुल फॅट मिल्क म्हणजेच साय न काढलेलं दूध घ्या. या दुधामध्ये कॉर्न फ्लॉवर घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या.
आता कॉर्नफ्लॉवर घातलेलं दूध गॅसवर गरम करायला ठेवा. गरम करताना वेळोवेळी हलवत राहा. नाहीतर मग दुधामध्ये गाठी होतात. साधारण ३ ते ४ मिनिटे दूध उकळून झाल्यानंतर गॅस बंद करा.
यानंतर दूध थंड होऊ द्या. दुधामध्ये व्हिप क्रिम घाला आणि तुम्हाला ज्या फ्लेवरचं आईस्क्रिम करायचं असेल त्या फ्लेवरचा क्रश घाला. फ्रुट क्रश घातला नाही तर प्लेन व्हॅनिला आईस्क्रिम छान होऊ शकतं.
चेहऱ्यावर वांगाचे डाग? खोबरेल तेलात २ पदार्थ मिसळून लावा- पिगमेंटेशन जाऊन त्वचा चमकेल
यानंतर ब्लेंडरने दूध आणि व्हिप क्रिमचं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या आणि एखाद्या एअर टाईट डब्यात घालून ते ३ तासांसाठी फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.
३ तासांनी अर्धवट सेट झालेलं आईस्क्रिम फ्रिजमधून काढून घ्या आणि पुन्हा एकदा ब्लेंडरने ४ ते ५ मिनिटे फेटून घ्या. आता हे आईस्क्रिम पुन्हा एकदा ८ ते १० तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
केसांना लावा टोमॅटो हेअर मास्क! डोक्यातला कोंडा कमी होऊन केस होतील मुलायम, सिल्की
विकतसारखं सॉफ्ट, चवदार आईस्क्रिम घरीच चाखायला मिळेल. व्हिप क्रिम आणि फ्रुट क्रश यामुळे आईस्क्रिमला गोडवा येतो. पण तुम्हाला जर आणखी गोड आईस्क्रिम हवं असेल तर तुम्ही त्यात थोडी पिठीसाखर घालू शकता.