गौरी-गणपती (Gauri-Ganpati 2025) म्हटलं की नवनवीन पदार्थ बनवले जातात. नेहमीच्या वरण-भाताला आराम देऊन तुम्ही बाप्पाच्या नैवेदयासाठी काहीतरी वेगळं बनवू शकता. तुम्हाला फार जास्त पदार्थ करायला वेळ नसेल तर तुम्ही मस्त व्हेज शाही पुलाव करू शकता. व्हेज शाही पुलाव एकदम सोपा आहे. याची रेसिपी तुम्हाला सहज जमेल. कमीत कमी वेळेत तयार होणारा व्हेज शाही पुलाव बाप्पाच्या नैवेद्यासाठी भन्नाट पर्याय आहे. व्हेज शाही पुलावची सोपी रेसिपी पाहूया. (How Make Shahi Pulao Easly) सिंपली स्वादीष्ट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या भारती म्हात्रे यांनी ही सोपी, सुंदर रेसिपी लोकमत सखीशी शेअर केली आहे.
व्हेज शाही पुलावची झटपट सोपी रेसिपी
- सगळ्यात आधी एक मोठं भाडं गरम करायला ठेवा. त्यात तूप घाला. तुपात सर्व ड्रायफ्रुट्स तळून घ्या. नंतर भांड्यात तेल घालून त्यात पनीर परतून घ्या. पनीर जास्त काळपट होणार नाही याची काळजी घ्या. लालसर झाल्यावर काढून घ्या.
- नंतर त्याच भांड्यात तेल आणि तूप घाला. सगळ्यात आधी जीरं, वेलची नंतर सर्व खडे मसाले, आलं घाला. नंतर यात भाज्या घाला. भाज्यांचे प्रमाण तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार घ्या. फरसबी, गाजर, मटार, फ्लॉवर अशा तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही परतून घ्या.
- भाज्या हलक्या कुरकुरीत होतील असं पाहा पण जास्त शिजू देऊ नका. त्यात आंबटपणा येण्यासाठी थोडं दही घाला. मग थोड्या वेळानं नारळाचं दूध घाला. त्यानंतर दूध थोडं आटवून त्यात मीठ घाला. मग शिजवलेला मऊ-मोकळा भात घाला.
- चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित एकजीव करून घ्या. मग त्यात पनीरचे तुकडे घाला. सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून वाफ काढून घ्या. वाफवताना मंद आचेवर ठेवा. तयार शाही पुलाव तुम्ही दह्याच्य कोशिंबीरीसोबत सर्व्ह करू शकता.