Lokmat Sakhi >Food > हे वाटण एकदा केले की १५ दिवस टिकेल, भाजी होईल अगदी झटपट.. पाहा वाटणाची रेसिपी

हे वाटण एकदा केले की १५ दिवस टिकेल, भाजी होईल अगदी झटपट.. पाहा वाटणाची रेसिपी

Vatan recipe it will last for 15 days, See how to make it : वाटणाची ही रेसिपी टिकते किमान पंधरा दिवस. करायला फारच सोपी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 19:05 IST2025-05-05T19:04:15+5:302025-05-05T19:05:06+5:30

Vatan recipe it will last for 15 days, See how to make it : वाटणाची ही रेसिपी टिकते किमान पंधरा दिवस. करायला फारच सोपी आहे.

Vatan recipe it will last for 15 days, See how to make it | हे वाटण एकदा केले की १५ दिवस टिकेल, भाजी होईल अगदी झटपट.. पाहा वाटणाची रेसिपी

हे वाटण एकदा केले की १५ दिवस टिकेल, भाजी होईल अगदी झटपट.. पाहा वाटणाची रेसिपी

भाजी करताना त्यामध्ये मसाले घालावे लागतात. फोडणी करावी लागते. इतरही काही पदार्थ असतात ते ही आपण भाजीत घालतो. परतलेल्या भाज्या छानच लागतात. (Vatan recipe it will last for 15 days, See how to make it)मात्र वाटण लावलेली भाजी चवीला फार छान लागते. वाटणाची भाजी करायचे म्हणजे नुसता फापटपसारा वाढवावा लागतो. घाई गडबड असताना तर वाटणाच्या भाज्या करायला वेळच मिळत नाही. मात्र हे वाटण करुन ठेवा आणि मग भाजी करताना फोडणी करुन त्यात वाटण घालायचे आणि त्यात भाजी घालायची इतर काहीही कष्ट नाहीत. (Vatan recipe it will last for 15 days, See how to make it)एकदा केलेले वाटण १५ ते २० दिवस टिकते. करायला अगदी सोपे आहे. बऱ्याच भाज्यांत घालू शकता. पाहा सोपी रेसिपी.   

साहित्य
कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, सुकं खोबरं, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, तेल, पाणी, धणे जिरे पूड

कृती
१. कढईमध्ये तेल पाणी काहीही घालू नका. फक्त कढई जरा गरम करुन घ्या. जरा तापल्यावर त्यामध्ये किसलेले सुके खोबरे घाला. मस्त परतून घ्या. त्याचा रंग बदलून तांबडा होईपर्यंत परता. नंतर खोबरं काढून घ्या आणि त्यामध्ये लसूण परता. लसणाचा रंगही बदलेल करपवू नका. खमंग परतून घ्या. 

२. कढईमध्ये थोडे तेल घाला आणि त्यावर कांदा अगदी खमंग परतून घ्या. त्यात हिरवी मिरची घाला मस्त परता आणि मग गार करत ठेवा. 

३. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परतलेलं खोबरं घ्या. लसूण घ्या. त्यात आल्याचे तुकडे घालाय गरम मसाला घाला. कांदा लसूण मसाला घाला. धणे-जिरे पूड घाला आणि मग मीठ घाला. कोथिंबीर जरा चिरा आणि त्यात घाला. सगळं छान वाटून घ्या . मसाला जाडसर सुकाच वाटा. 

४. नंतर कांद्याबरोबर तो मसाला परतून घ्या. त्यात अगदी थोडे पाणी घाला. सगळे मसाले एकजीव होऊ द्या. छान खमंग वास दरवळायला लागला की गॅस बंद करायचा. वाटण गार होऊ द्यायचे आणि गार झाल्यावर ते छान पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या. सगळे पदार्थ एकजीव करुन घ्या. त्यात चवी पुरते मीठ घाला. एका हवाबंद डब्यामध्ये काढून घ्या. फ्रिजमध्ये तो डब्बा ठेऊन द्या.     

Web Title: Vatan recipe it will last for 15 days, See how to make it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.