Lokmat Sakhi >Food > तळा पापड पण तेलाची गरज नाही! तेल न वापरता पापड तळण्याची ही पाहा युक्ती, बिनतेलाचं तळण..

तळा पापड पण तेलाची गरज नाही! तेल न वापरता पापड तळण्याची ही पाहा युक्ती, बिनतेलाचं तळण..

Use 'This' And Fry Papad Without Oil : तेलाचा वापर टाळा पण चविष्ट पदार्थ नको. पाहा कसे तळायचे तेलाशिवाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 17:35 IST2025-03-05T17:32:10+5:302025-03-05T17:35:46+5:30

Use 'This' And Fry Papad Without Oil : तेलाचा वापर टाळा पण चविष्ट पदार्थ नको. पाहा कसे तळायचे तेलाशिवाय.

Use 'This' And Fry Papad Without Oil | तळा पापड पण तेलाची गरज नाही! तेल न वापरता पापड तळण्याची ही पाहा युक्ती, बिनतेलाचं तळण..

तळा पापड पण तेलाची गरज नाही! तेल न वापरता पापड तळण्याची ही पाहा युक्ती, बिनतेलाचं तळण..

वजन वाढण्याची समस्या लॉकडाऊन नंतर प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लोक आता खाण्याच्या सवयींकडे खास लक्ष देतात. गोड पदार्थ खाणे टाळतात. तळलेले पदार्थ खाणे टाळतात. (Use 'This' And Fry Papad Without Oil)पण असे पदार्थ खाल्याशिवाय मनाला समाधान वाटतंच नाही. मन मारून अन्न जबरदस्ती खावे लागते. वजन झपाट्याने वाढवणारा पदार्थ म्हणजे तेल. तेल आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो खरं पण तेलामुळे फॅट्स झपाट्याने वाढतात. त्यामुळे आपण तळलेले पदार्थ खाणे टाळतो.(Use 'This' And Fry Papad Without Oil)

असेही खवय्ये असतात, ज्यांना विविध पर्याय शोधायला आवडतात. एखाद्या अनहेल्दी पदार्थाची जागा घेऊ शकेल असा हेल्दी पदार्थ ते शोधून काढतात. जसे की, साखरेऐवजी गूळ वापरणे. मैद्याऐवजी कणीक वापरणे. आदी. आजकाल एअरफ्रायरचा वापर भरपूर केला जातो. त्यामध्ये अगदी चमचाभर तेलामध्ये वडे, भजी त्यामध्ये तळल्याप्रमाणेच कुरकूरीत होते.(Use 'This' And Fry Papad Without Oil) मात्र एअरफ्रायर सगळ्यांकडे असतोच असे नाही.  

पापडासारखे पदार्थ आपण भाजूनसुद्धा खातो. पण तळलेल्या पापडाची चव आणि भाजलेल्या पापडाची चव यामध्ये भरपूर फरक पडतो. तसेच नळ्या वगैरे खायला तर आपल्याला प्रचंडच आवडते. ते कमी तेलात तळणेही शक्य नाही. तुम्हाला ही तेलाशिवाय कुरकूरीत पापड आणि फ्रायम्स खायचे आहेत का? मग हा एक पदार्थ वापरा, जो तुमच्या घरातच आहे. रोज वापरता. पण त्यामध्ये मस्त पापड फुलतो हे तुम्हाला माहिती नसेल. तो पदार्थ म्हणजे मीठ. मीठाच्या मदतीने अगदी कुरकूरीत तळणीसारखे पापड आणि इतर सुखे तळणीचे पदार्थ तयार करता येतात. 

कृतीही फार सोपी आहे. एका कढईमध्ये मीठ घ्यायचे. एक दोन वाट्या भरून वापरा. जास्तही चालेल. ते वाया जात नाही नंतर वापरता येते. एक पाच मिनिटे ते मीठ घरम करत ठेवा. जरा गरम झाले की, त्यामध्ये पापड टाका आणि सतत ढवळत राहा. इतरही जे पदार्थ टाकाल ते सतत ढवळायचे. एका मिनिटामध्ये ते फुलायला लागतात. मीठ वर खाली करत पापड व्यवस्थित तयार करून घ्यायचा. आणि मग काढून घ्यायचा. मीठ जरा झटकून घ्यायचे. पदार्थाला मीठाची चव लागत नाही. पापड अजिबात खारट होत नाही. कोरडे मीठ कोणत्याही कोरड्या पदार्थामध्ये शोषले जात नाही.   

Web Title: Use 'This' And Fry Papad Without Oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.