घरातील फ्रिजचा वापर करताना अनेकदा आपण काही चुका करतो ज्यामुळे वीजबील खूपच जास्त येते. फ्रिजचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास लाईट बील नक्कीच कमी होईल. या साध्या टिप्स कोणत्या ते पाहूया. (Use these smart tips while using the refrigerator at home, your light bill will be reduced drastically, and you will save on electricity costs.)
1) फ्रिज नेहमी भिंतीपासून ६ ते १० इंच दूर ठेवा. जेणेकरून गरम हवा बाहेर पडायला पुरेशी जागा राहील तसंच थेट सुर्यप्रकाशापासून संरक्षण होईल. फ्रिजचे तापमान आवश्यकतेनुसार सेट करा. खूप तापमान कमी ठेवल्यास वीज जास्त खर्च होईल.
2) कोणताही पदार्थ थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ठेवा. गरम पदार्थ ठेवल्यास फ्रिजला थंड करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. गरज नसताना किंवा वारंवार फ्रिजचे दरवाजे उघडू नका. प्रत्येकवेळी दार उघडल्यावर गरम हवा आत जाते आणि फ्रिजला पुन्हा थंड होण्यासाठी वीज लागते. फ्रिजमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी जागा ठेवा. अगदी जास्त भरल्यास हवा सर्वत्र पोहोचत नाही. ज्यामुळे वीज जास्त खर्च होते तसंच पदार्थांवर झाकण ठेवूनच मग फ्रिजमध्ये ठेवा.
4) फ्रिजच्या दाराला असलेलं रबर व्यवस्थित सील होत आहे की नाही ते नियमित तपासा जर ते खराब झालं तर थंड हवा बाहेर जाते आणि फ्रिजला जास्त काम करावे लागते. कागद किंवा पातळ नोट दरवाज्यात दाबून बघा ती सहज बाहेर येत असेल तर गॅस्केट बदलणं आवश्यक आहे.
5) फ्रिजरमध्ये जास्तीचा बर्फ साचू देऊ नका. जास्त बर्फ साचल्यास फ्रिजच्या कार्यक्षमतेवर परीणाम होतो आणि वीजही जास्त लागते तसंच फ्रिज नियमित डिफ्रॉस्ट करा. जर तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जात असाल तर फ्रिजमध्ये लवकर खराब होणारे पदार्थ काढून टाका. व्हॅकेशन मोड वापरा ज्यामुळे वीज कमी खर्च होईल.
6) फ्रिजमध्ये कोणताही द्रव पदार्थ उघडा ठेवू नका. असं केल्यास त्या पदार्थातून येणाऱ्या आद्रतेमुळे फ्रिज खराब होऊ शकतं आणि कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागते. नेहमी एअरटाईट डब्यात किंवा झाकून मगच ठेवा.
7) फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या किंवा ज्यूसची बाटली भरताना ती नेहमी रिकामी झाल्यावर लगेच भरून ठेवा. थंड पाण्याची जागा भरण्यास वेळ लावल्यास फ्रिजमधील थंडपणा टिकवून ठेवण्यासाठी कॉम्प्रेसरला वारंवार चालू व्हावे लागते. भरलेल्या बाटल्यांमुळे फ्रिजमधील थंडपणा अधिक काळ टिकून राहतो.
