Lokmat Sakhi >Food > उडीदाच्या डाळीचे खमंग वरण, गरमागरम भातासोबत खा- पाहा पारंपरिक रेसिपी, पावसाळा स्पेशल

उडीदाच्या डाळीचे खमंग वरण, गरमागरम भातासोबत खा- पाहा पारंपरिक रेसिपी, पावसाळा स्पेशल

healthy Indian dal recipe : urad dal varan for lunch: simple dal rice recipe: नेहमीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर उडीदाच्या डाळीचे खमंग वरण नक्की ट्राय करुन बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 09:35 IST2025-06-23T09:30:00+5:302025-06-23T09:35:01+5:30

healthy Indian dal recipe : urad dal varan for lunch: simple dal rice recipe: नेहमीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर उडीदाच्या डाळीचे खमंग वरण नक्की ट्राय करुन बघा.

urad dal curry recipe traditional Maharashtrian dal monsoon special food ideas simple dal recipe | उडीदाच्या डाळीचे खमंग वरण, गरमागरम भातासोबत खा- पाहा पारंपरिक रेसिपी, पावसाळा स्पेशल

उडीदाच्या डाळीचे खमंग वरण, गरमागरम भातासोबत खा- पाहा पारंपरिक रेसिपी, पावसाळा स्पेशल

गरमागरम वरण भात आणि त्यावर साजूक तुपाची धार असं जेवण भारतीय घरांमध्ये हमखास खाल्ल जाते.(urad dal curry recipe) भारतीय जेवणाच्या थाळीत चपाती, भाजी-भात, डाळ असे सगळेच पदार्थ असतात. जेवणात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खातो. डाळ बदलली की त्याची चव देखील बदलते. (traditional Maharashtrian dal)
गरमागरम भातासोबत तुरीच्या डाळीची आमटी केली जाते.(monsoon special food ideas) पण नेहमीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर उडीदाच्या डाळीचे खमंग वरण नक्की ट्राय करुन बघा. या डाळीमध्ये प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारख्या आवश्यक खनिजे आहेत.(simple dal rice recipe) जे आपले पचन सुधारण्यास, हृदयाला पुरेशी ऊर्जा देण्यास आणि हाडांना मजबूत करण्यास मदत करते. या डाळीचे वरण हे आपण आजारी असल्यास किंवा तोंडाची चव बिघडल्यास खाल्ल्याने आराम मिळतो. हे खमंग वरण कसे बनवायचे पाहूया. (comfort food for rainy season)

भाजीत तेल जास्त झाले? ४ सोपे उपाय- पदार्थ बिघडणार नाही, होईल अधिक चविष्ट

साहित्य 
उडीद डाळ - १ छोटी वाटी 
तुरीची डाळ - १/२ छोटी वाटी 
पाणी 
तेल - २ मोठे चमचे 
मोहरी - अर्धा चमचा 
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - ३ ते ४
किसलेलं आले - अर्धा चमचा 
हळद - अर्धा चमचा 
हिंग - आवश्यकतेनुसार 
मीठ - चवीनुसार 
बारीक चिरलेली कोथिंबीर 


कृती 

1. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात उडीदाची आणि तुरीची डाळ लालसर होईपर्यंत भाजून घ्या. उडीदाच्या डाळीला उग्र वास असतो. हा वास जाण्यासाठी डाळ व्यवस्थित भाजून घ्यायला हवी. 

2. त्यानंतर भाजलेली डाळ २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता कुकरमध्ये ३ कप घालून धुतलेली डाळ शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर कुकर थंड झाल्यावर डाळीला व्यवस्थित घोटून घ्या. जास्त घट्ट झाली असेल तर आवश्यकतेनुसार वरुन गरम पाणी घाला. 

3. डाळीला फोडणी देण्यासाठी आता कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी तडतडू द्या. त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले, हळद, हिंग घालून फोडणीचा खमंग वास येईपर्यंत होऊ द्या. 

4. फोडणीचा झाल्यानंतर वरुन तयार डाळीचे मिश्रण त्यात घाला. वरुन मीठ घालून डाळीला दोन वेळा उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करुन चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम भातासोबत खा उडीदाच्या डाळीचे खमंग वरण. 

 

Web Title: urad dal curry recipe traditional Maharashtrian dal monsoon special food ideas simple dal recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.