उन्हाळा सुरू झाला की खवय्यांसाठी त्याचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे वाळवण. हे वाळवणाचे पदार्थ जेवढे वाळल्यानंतर तळून, भाजून किंवा कच्चे खाण्यात मजा असते, तेवढीच मजा ते पदार्थ अर्धवट ओले असताना खाण्यातही येते. खारोड्या, सांडगे, बटाट्याच्या चकल्या, साबुदाण्याचे पापड असे पदार्थ ओलसर असताना खाणं ही अनेकांसाठी जणू काही पर्वणीच.. आता तुम्हालाही असे वाळवणाचे पदार्थ आवडत असतील आणि त्यात उपवासासाठी काहीतरी खास हवं असेल तर उपवासाचे सांडगे किंवा वडे एकदा करून पाहा (Upvas Special Valvan in Summer). त्याची पुढे सांगण्यात आलेली रेसिपी अगदी सोपी असून या पद्धतीने केलेले सांडगे खूप खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत होतील.(upvas special sandge recipe)
उपवासाचे सांडगे किंवा वडे करण्याची रेसिपी
साबुदाणा १ किलो
बटाटा पाऊण किलो
थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल
१० ते १५ हिरव्या मिरच्या
२ टेबलस्पून जिरेपूड
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
कृती
सांडगे करण्यासाठी सगळ्यात आधी तर साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर साबुदाणा बुडेल एवढं त्यात साधं पाणी घाला आणि १० ते १२ तास साबुदाणा पाण्यात चांगला भिजू द्या.
भिजवलेला साबुदाणा एका चाळणीमध्ये काढून घ्या. जेणेकरून त्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईल. यानंतर बटाटेही उकडून घ्या.
आमवाताचं दुखणं असेल तर सकाळी उठताच जाणवतात 'ही ' लक्षणं- वेळीच सावध होऊन ५ उपाय करा
उकडून घेतलेला बटाटा, साबुदाणा एका पसरट भांड्यात एकत्र करा. त्यामध्ये मिक्सरमधून वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीनुसार तिखट आणि मीठ घाला. सगळं मिश्रण अगदी एकजीव करून घ्या. यानंतर हाताला थोडं शेंगदाणा तेल किंवा मग पाणी लावून वडे तोडा. हे वडे छान कडकडीत वाळू द्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा. वर्षभर चांगले टिकतील.
