आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरी नाश्त्याला मेदूवडा, इडली, डोसा यांसारखे पदार्थ केले जातात. असे पदार्थ शक्यतो चटणी आणि सांबारसोबत खायला अधिकच र टेस्टी लागतात. मेदूवडा, इडली, डोसा (How To Make Neer Chutney At Home) यांसारखे दाक्षिणात्य पदार्थ हे चटणी (Neer Chutney Recipe) आणि सांबाराशिवाय अपूर्णच आहेत. इडली, डोसा, मेदूवडा असे पदार्थ खाताना सोबत चटणी (Udpi Style Neer Chutney) तर हवीच असते, खरंतर या पदार्थांसोबतच दिल्या जाणाऱ्या चटणीमुळेच असे पदार्थ खायला अधिक रुचकर आणि चविष्ट लागतात. आपण सुद्धा असे पदार्थ घरी केले की त्यासोबत हमखास चटणी करतोच(Restaurant style watery neer chutney for idli & dosa).
अशा पदार्थांसोबत चटणी करायची म्हटलं की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करतोच. काहीजण लाल मिरचीची तिखट, झणझणीत लाल चटणी करतात तर काही हिरव्या मिरचीची हिरवी चटणी करतात. कधी फोडणीची तर कधी नुसती साधी चटणी, तर कधी सुकी चटणी असे चटण्यांचे असंख्य प्रकार. परंतु एखाद्या उडप्याकडे किंवा हॉटेलमध्ये अशा पदार्थांसोबत दिल्या जाणाऱ्या चटणीची चव काही वेगळीच असते. आपण घरी अनेकदा खूप प्रयत्न केले तरीही उडप्याकडे मिळते तशी चटणी घरी होत नाही. यासाठीच उडप्याकडे किंवा हॉटेलमध्ये अशा दाक्षिणात्य पदार्थांसोबत दिली जाणारी स्पेशल नीर चटणीची खास रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. शेंगदाणे - १/२ कप
२. भाजलेली चणा डाळ - २ टेबलस्पून
३. ओलं खोबरं - १/२ कप
४. आलं - १ लहान तुकडा
५. लसूण पाकळ्या - ५ पाकळ्या
६. हिरव्या मिरच्या - ५ मिरच्या
७. कांदा - १ कांदा
८. चिंच - १ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. पाणी - गरजेनुसार
११. कोथिंबीर - १/४ कप
१२. तेल - २ टेबलस्पून
१३. मोहरी - १ टेबलस्पून
१४. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून
१५. कडीपत्ता - १० ते १२ पाने
१६. लाल सुक्या मिरच्या - २
१७. हिंग - १ टेबलस्पून
साचवून ठेवलेल्या तुपाला काही दिवसांनी कुबट वास येतो? तुपात २ पदार्थ मिसळा, तूप छान राहील...
ढोकळा कायम फसतो, फुगतच नाही? ८ टिप्स- विकतपेक्षा हलका ढोकळा करा घरच्याघरीच...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, बिया काढून घेतलेली चिंच घालावीत. हे सगळे जिन्नस किमान २ ते ३ मिनिटे तेलात हलकेच परतून घ्यावेत.
२. आता एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यात पॅनमध्ये शिजवून घेतलेले वरील सर्व जिन्नस घालावेत. त्यानंतर त्यात शेंगदाणे, भाजलेली चणा डाळ, किसलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ व गरजेनुसार पाणी घालावे. आता मिक्सरमधील हे सगळे जिन्नस एकत्रित वाटून बारीक करून घ्यावेत.
‘आवळा राईस’ नाही खाल्ला हिवाळ्यात? आवळा म्हणजे आरोग्यासाठी अमृत, ही घ्या रेसिपी...
३. मिक्सरमध्ये नीर चटणीचे मिश्रण वाटून घेतल्यानंतर ते एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडे पाणी घालून चटणी थोडी पातळ करून घ्यावी.
५. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात चटणीसाठीची खमंग फोडणी तयार करून घ्यावी. यासाठी तेलात मोहरी, पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, लाल सुक्या मिरच्या, कडीपत्ता घालून ही गरमागरम फोडणी चटणीवर ओतावी.
आपली खमंग 'नीर चटणी' खाण्यासाठी तयार आहे. मेदूवडा, डोसा, इडली सोबत दिली जाणारी उडपी स्टाईल 'नीर चटणी' खाण्यासाठी तयार आहे.