तुम्हालाही पौष्टिक पदार्थ चविष्ट करून खायला आवडतात का? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. फलाफल या पदार्थाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. (Try This Recipe, healthy Fhalafhal With Salad..)तळलेला असतो म्हणून आपण खाण्याचे टाळतो. पण हा चविष्ट पदार्थ एकदम हेल्दी पद्धतीने तयार करता आला तर? द वेजिटेरीयन लडकी तिच्या पेजवर मस्त हेल्दी रेसिपी टाकत असते. ती म्हणते, "डाएट बोरींगच असायला हवं असं काही नाही. (Try This Recipe, healthy Fhalafhal With Salad..)पौष्टिक पदार्थांना नक्कीच मजेशीर बनवता येते."
या रेसिपीमध्ये १८ग्रॅम प्रोटीन आहे. पचायला हलके आहे. मोड आलेल्या कडधान्यांपासून हे फलाफल तयार केलेले आहे. या रेसिपीचे नाव 'स्प्राऊट फलाफल विथ बिटरूट रायता' असे आहे. फारच झटपट तयार होणारी रेसिपी आहे. दिसायलाही हिरवी, गुलाबी अशी असल्याने छान दिसते.
साहित्य (एका माणसासाठी तयार करण्याच्या प्रमाणासहित)
बीटाचा रायता
५० ग्रॅम फेटलेले दही
१ बीट
चमचाभर तूप
१ चमचा जीरं
१ चमचा मोहरी
४ ते ५ कडीपत्याची पाने
मीठ(Try This Recipe, healthy Fhalafhal With Salad..)
कृती
१. एका खोलगट ताटलीमध्ये फेटलेले दही घ्या. त्यावरती वाफवलेल्या बीटाचे बारीक तुकडे करून घाला. छान एकजीव करून घ्या.
२. एका फोडणीच्या भांड्यात चमचाभर तूप गरम करा. त्यात जीरं, मोहरी आणि कडीपत्ता घाला. तयार फोडणी मिश्रणावर घाला व नीट मिक्स करून घ्या.
फलाफल (या प्रमाणानुसार ६ मध्यम फलाफल तयार होतील)
१०० ग्रॅम मोड आलेले मूग
१ चमचा बेसन
२ चमचे चिरलेला कांदा
थोडीशी कोथिंबीर
मीठ
कृती
१. मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घ्या. त्यामध्ये कांदा घाला. थोडी कोथिंबीर घाला. मीठ घाला. आणि ते वाटून घ्या.
२. एका तटलीत काढा . त्यावर बेसन घाला. आणि सगळं मस्त मिक्स करून घ्या.
३. घरी जर एअरफ्रायर असेल तर त्यामध्ये फ्राय करा. म्हणजे एकदम हेल्दी तयार होईल. पण नसेल तर मग, थोड्या तुपाचा वापर करून ते तव्यावर शालो फ्राय करून घ्या.
आता तयार रायता आणि फलाफल एकत्र करा व खा. अत्यंत पौष्टीक आणि मस्त अशी रेसिपी नक्की करून बघा.