Lokmat Sakhi >Food > पपनसाचा हा पदार्थ एकदा खा पुन्हा नक्की कराल, चवीला अगदी मस्त आणि करायला फक्त पाच मिनिटे

पपनसाचा हा पदार्थ एकदा खा पुन्हा नक्की कराल, चवीला अगदी मस्त आणि करायला फक्त पाच मिनिटे

Try this pomelo dish once and you will definitely love it , easy and tasty recipes : पपनस खायला आवडत नसेल तर एकदा ही रेसिपी करुन पाहा. नक्की आवडायला लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 17:29 IST2025-08-18T17:24:47+5:302025-08-18T17:29:02+5:30

Try this pomelo dish once and you will definitely love it , easy and tasty recipes : पपनस खायला आवडत नसेल तर एकदा ही रेसिपी करुन पाहा. नक्की आवडायला लागेल.

Try this pomelo dish once and you will definitely love it , easy and tasty recipes | पपनसाचा हा पदार्थ एकदा खा पुन्हा नक्की कराल, चवीला अगदी मस्त आणि करायला फक्त पाच मिनिटे

पपनसाचा हा पदार्थ एकदा खा पुन्हा नक्की कराल, चवीला अगदी मस्त आणि करायला फक्त पाच मिनिटे

महाराष्ट्रात काही हंगामी अशी फळे मिळतात जी चवीला फार मस्त असतात. जसे की पपनस. पचन सुधारण्यासाठी शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पपनस उपयुक्त ठरते. (Try this pomelo dish once and you will definitely love it , easy and tasty recipes )जीवनसत्त्व 'सी' मिळवण्यासाठी पपनस एकदम मस्त स्त्रोत आहे. पपनसची चव तशी सगळ्यांना फार आवडत नाही. काही ठिकाणी पपनस नुसते खाल्ले जाते मात्र त्याची कोशिंबीर करुन जास्त छान लागते. ताज्या पपनसाची भेळ म्हणा किंवा कोशिंबीर प्रसादासाठी करता येते. चव एकदम मस्त असते. पपनस चवीला किंचित तुरट असते. ताजे नसेल तर भरपूर तुरट लागते. त्यामुळे पपनस नुसते खाणे किंवा फक्त साखर घालून खाण्यापेक्षा त्याचे विविध पदार्थ करता येतात. ते एकदा नक्की खाऊन पाहा.  


 
साहित्य 
पपनस, नारळ, हिरवी मिरची, साखर, लिंबू , डाळिंब 

कृती
१. डाळिंबाचे दाणे सोलून घ्या. पपनस फोडायचे आणि सोलून घ्यायचे. आतील गर काढून घ्यायचा. पपनसाच्या फोडी करायच्या. मग तो मोकळा करायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. एकदम बारीक तुकडे करायचे. लिंबाचा रस काढून घ्यायचा. 

२. छान ताजा नारळ फोडून घ्यायचा. व्यवस्थित खवायचा. पांढरा भागच घ्या. नारळ फोडताना जे पाणी निघते ते बाजूला ठेवा. नारळ फोडून झाल्यावर एका खोलगट पातेल्यात नारळ घ्यायचा. त्यात पपनस घालायचा आणि त्यावर नारळाचे पाणी ओतायचे. 

३. पपनसाचे पाणी घातल्यावर त्यात साखर घालायची. साखरेचे प्रमाण आवडीनुसार घ्यायचे. पपनस मुळात जरा गोडसर असते. भरपूर गोड नसते. त्यामुळे साखर घालण्याआधी पपनसाची चव पाहा आणि प्रमाण ठरवा. नारळाच्या पाण्यामुळे साखर पटकन एकजीव होते. 

४. थोडावेळ मिश्रण बाजूला ठेवायचे. मग त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. लिंबू पिळायचा. तसेच डाळिंब्यांचे दाणे घालायचे आणि ढवळायचे. नारळ कमी घालू नका मस्त भरपूर वापरा. मिश्रण थोडावेळ झाकून ठेवा. सगळे पदार्थ एकत्र छान मुरतात.  

  

Web Title: Try this pomelo dish once and you will definitely love it , easy and tasty recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.