Lokmat Sakhi >Food > पराठा असो वा पोळी चटपटा सॉस तो बनता है! हे घ्या ३ डिप्स, पौष्टिक आणि चविष्ट

पराठा असो वा पोळी चटपटा सॉस तो बनता है! हे घ्या ३ डिप्स, पौष्टिक आणि चविष्ट

Try These 3 Dips, Nutritious And Tasty Goes With Roti, Paratha And Everything : सॉसऐवजी हे डिप्स खा. दहा मिनटात तयार होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 08:25 IST2025-02-12T08:20:25+5:302025-02-12T08:25:02+5:30

Try These 3 Dips, Nutritious And Tasty Goes With Roti, Paratha And Everything : सॉसऐवजी हे डिप्स खा. दहा मिनटात तयार होतात.

Try These 3 Dips, Nutritious And Tasty .. Goes With Roti, Paratha And Everything | पराठा असो वा पोळी चटपटा सॉस तो बनता है! हे घ्या ३ डिप्स, पौष्टिक आणि चविष्ट

पराठा असो वा पोळी चटपटा सॉस तो बनता है! हे घ्या ३ डिप्स, पौष्टिक आणि चविष्ट

घरच्या घरी मस्त हेल्दी पराठा तयार करून मुलांना खाऊ घालता. बाहेरचं अजिबात खायला देत नाही. पण मग पराठ्याच्या जोडीला काय देता? ( Try These 3 Dips, Nutritious And Tasty .. Goes With Roti, Paratha And Everything)मुलं तो कशाशी लावून खातात? विकतच्या सॉसबरोबरच खाल्ला ना? मग एवढे कष्ट करून त्यांना भरवलेले पौष्टिक अन्न ६०% अॅडेड शूगरच्या बरोबरच पोटात गेले. मुलांना अशा हेल्दी पदार्थांबरोबर कायम दही खायला तर सांगू शकत नाही. या घ्या तीन डीप्सच्या रेसिपी. अगदी सोप्या आहेत.( Try These 3 Dips, Nutritious And Tasty .. Goes With Roti, Paratha And Everything) सॉसपेक्षाही चविष्ट आणि हो.. साखर तर अजिबात नाही.

१. सॅन्डविच सारख्या पदार्थांशी लावून खाण्यासाठी हे डिप तयार करा. पौष्टिक आहे. एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू घ्या. त्यात सिमला मिरची तुकडे करून टाका. वरतून एक चमचा लिंबाचा रस घाला. चवीनुसार मीठ घाला. दोन चमचे पाणी घाला. मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्या. ( Try These 3 Dips, Nutritious And Tasty .. Goes With Roti, Paratha And Everything)आंबट गोड असे डिप तयार होईल. लहान मुलं सिमला मिरची खाण्यासाठी नाटकं करतात. त्यांना कळणारही नाही आणि सिमला मिरची त्यांच्या पोटात जाईल.

२. पराठ्यासारख्या पदार्थांबरोबर खाण्यासाठी मटार डिप तयार करा. मटार मस्त उकडून घ्या. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तिखटाचा अंदाज घेऊन मिरची वापरा. अति तिखट नको. चमचाभर गूळाची पावडर घाला. दोन चमचे मोहरी घाला. मोहरी पावडर वापरू नका, सगळं कडू होऊन जाईल. थोडासा लिंबाचा रस घाला. भरपूरसं जीरं घाला. चवीनुसार मीठ घाला. अगदी थोडं पाणी घाला. आता सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्या.

३. आपलं तिसरं डिप मुलांनाच काय तर सगळ्यांनाच भरपूर आवडेल. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू घ्या. त्यात उकडलेले बीट घाला. त्यात ताजा पुदिना घाला. चवीपुरती मिरची घाला. थोडासा लिंबाचा रस घाला. मीठ घाला. मिक्सरमध्ये फिरेल एवढंच पाणी घाला. याला बीटामुळे रंग फारच छान येतो. पौष्टिक तर आहेच. तसेच सगळ्याच पदार्थांशी लावून खाता येते.

तिन्ही डिप थोडे घट्टच ठेवा. चवीला मस्तच लागतात. तयारही अगदी दहा मिनटात होतात. नक्की तयार करून बघा.

Web Title: Try These 3 Dips, Nutritious And Tasty .. Goes With Roti, Paratha And Everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.