पराठा हा पदार्थ फार आवडीने खाल्ला जातो. विविध प्रकारचे पराठे केले जातात.(Try the crispy onion paratha, it will become a permanent favorite) त्यापैकी एक म्हणजे कांद्याचा पराठा. हा पराठा चवीला मस्त आणि करायला सोपा आहे. पाहा रेसिपी.
साहित्य
कांदा, कणीक, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, हळद, हिंग, तूप, हिरवी मिरची, धणे-जिरे पूड, आलं, लसूण, कसूरी मेथी, पांढरे तीळ, पाणी, ओवा, तेल
कृती
१. सगळ्यात आधी मस्त कणीक मळून घ्या. (Try the crispy onion paratha, it will become a permanent favorite)त्यासाठी परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. हळद घाला. तसेच हाताच्या तळव्यांमध्ये ओवा मस्त मळा आणि मग पिठामध्ये टाका. दोन चमचे तेल गरम करा आणि ते ही पिठामध्ये टाका. पीठ व्यवस्थित मिक्स करुन घ्या. हळद मीठ पिठात एकजीव झाल्यावर त्यामध्ये हळूहळू पाणी घाला आणि छान कणीक मळून घ्या. नंतर कणकेला वरतून थोडे तेल लावा आणि कणीक झाकून ठेवा.
२. कांदा लांब लांब चिरुन घ्या. एकदम पातळ असे काप करा. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. तसेच लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घ्या. त्यामध्ये सोल्लेली लसूण घाला तसेच हिरवी मिरची घाला. जाडसर वाटून घ्या.
३. लांब चिरलेला कांदा एका खोलगट भांड्यामध्ये घ्या. त्यामध्ये आलं- लसूण - मिरची पेस्ट घाला. तसेच धणे जिरे पूड घाला. थोडी कसूरी मेथी हातावर मळा आणि मग मिश्रणामध्ये टाका. थोडे हिंग घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. लाल तिखट आवडीनुसार घाला. मीठ घाला. सगळं छान मिक्स करुन घ्या.
४. पिठाचे गोळे करुन घ्या. पोळीसाठी करता त्यापेक्षा जास्त जाड लाटी करा. तयार केलेले मिश्रण लाट्यांमध्ये भरा. सगळीकडून नीट बंद करा म्हणजे सारण बाहेर येणार नाही. लाटी पोलपाटावर छान लाटून घ्या. जरा जाडच ठेवा.
५. लाटून झाल्यावर त्याला वरुन पांढरे तीळ लावा. तसेच चिरलेली कोथिंबीरही टाका. तूप लावा आणि तूप लावलेली बाजू तव्यावर टाका. दोन्ही बाजूंनी तुपावर मस्त परतून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत परता. मग सॉस किंवा चटणीशी लाऊन खा.