Join us

मिरच्यांचा ठेचा करतोच आता करा दोडक्याचा गावरान झणझणीत ठेचा, नावडता दोडका होईल आवडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2023 14:31 IST

Try Out New Dodkyacha Thecha | Maharashtrian Recipe दोडक्याची भाजी अनेकांना आवडत नाही पण ठेचा करुन पाहा, तोंडाला चव येईल

जेवताना तोंडी लावण्यासाठी जर झणझणीत पदार्थ असेल तर, जेवणाची रंगत दुपट्टीने वाढते. तोंडी लावण्यासाठी अनेक प्रकार केले जातात. पापड, कुरडई, लोणचं, चटणी, ठेचा हे पदार्थ केले जातात. अनेक जण ठेचा आवडीने खातात. ठेचा चपाती, भात, भाकरी, खिचडीसोबत अप्रतिम लागते. आपण आतापर्यंत फक्त मिरचीचा ठेचा खाऊन पहिला असेल, पण कधी दोडक्याचा ठेचा खाऊन पाहिला आहे का?

दोडक्याची भाजी आपण खाल्लीच असेल, पण ठेचा? ऐकून आश्चर्य वाटलं ना? जर आपल्याला तिच तिच भाजी खाऊन कंटाळा असेल तर, दोडक्याचा ठेचा करून पाहा. हा ठेचा जेवणाची रंगत तर वाढवेलच, यासह जिभेची चव देखील वाढवेल(Try Out New Dodkyacha Thecha | Maharashtrian Recipe).

दोडक्याचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य

दोडका

तेल

शेंगदाणे

जिरं

लसणाच्या पाकळ्या

चिरलेला पालक-किसलेला बटाटा-करुन पाहा कुरकुरीत भजी, मस्त बरसत्या पावसात खमंग बेत

हिरव्या मिरच्या

मीठ

हिंग

कडीपत्ता

कृती

सर्वप्रथम, तव्यात तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात ३ टेबलस्पून शेंगदाणे, एक टेबलस्पून जिरं, १० ते १२ लसणाच्या पाकळ्या, ८ ते १० हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालून भाजून घ्या.

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत खमंग भजी! पाऊस - पोहे भजी आणि चहा, व्हा फ्रेश

आता एका खलबत्त्यात हे भाजलेलं मिश्रण काढून घ्या, व ठेचून पेस्ट तयार करा. आता एक दोडका स्वच्छ धुवून घ्या, त्याची साल काढा, व बारीक किसून घ्या. तव्यात २ चमचे तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात हिंग, कडीपत्ता घालून भाजून घ्या, त्यानंतर त्यात किसलेला दोडका, व मिरचीचा ठेचा घालून मिक्स करा. ५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. दोडक्याचा ठेचा तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढा, व शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.