उन्हाळ्यात थंडगार, चटकदार आणि ताजेतवाने पेय हवे असेल तर घरच्या घरी बनवलेला संत्र्याचा सोडा हा एक भन्नाट पर्याय ठरतो. बाजारातील रेडीमेड पेयांपेक्षा हा अधिक नैसर्गिक, चविष्ट आणि आपल्या आवडीप्रमाणे बनवता येणारा आहे. (Try making orange soda at home this summer, it tastes great , must try recipe )संत्र्याची आंबट-गोड चव, पुदिन्याचा ताजेपणा आणि सोड्याची झणझणीत फिज यामुळे हा पेय प्रकार खूपच रिफ्रेशिंग वाटतो.
संत्र्याचा सोडा पिण्याचे फायदेही अनेक आहेत. संत्र्यामध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी हे पेय उपयोगी ठरते. लिंबू आणि मीठ यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहण्यास मदत होते. पुदिन्यामुळे पचन सुधारते आणि ताजेतवानेपणा मिळतो. थकवा, उष्णता आणि घामामुळे आलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी हा सोडा उत्तम आहे.
साहित्य: संत्री, साखर, लिंबू, मीठ, पुदिना, बर्फ, सोडा
कृती:सर्वप्रथम संत्री सोलून त्याचा रस काढून घ्या. हा रस मिक्सरमधून वाटून घ्यायचा. त्यात साखर, लिंबाचा रस, मीठ आणि पुदिन्याची पाने घालून थोडे ब्लेंड करुन घ्यायचे. म्हणजे सगळं छान एकजीव होईल. सगळं छान एकजीव झाल्यावर गाळून घ्यायचे. चोथा काढून टाकायचा. आता ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला. त्यावर तयार मिश्रण ओता. शेवटी वरून थंड सोडा घालून ढवळून घ्या.
तयार झालेला संत्र्याचा सोडा लगेच सर्व्ह करा. वरून पुदिन्याची पाने किंवा संत्र्याचा स्लाइस घालून सजवल्यास तो आणखी आकर्षक दिसतो. अशा प्रकारे घरच्या घरी बनवलेला संत्र्याचा सोडा हा केवळ चविष्टच नाही तर शरीराला ऊर्जा देणारा, थंडावा देणारा आणि पचनासाठीही उपयुक्त असा उत्तम आहे. उन्हाळ्यातील गरमीपासून थोडा आराम मिळवण्यासाठी हा सोडा नक्की करून पाहा.
Web Summary : Homemade orange soda is a refreshing summer drink, packed with vitamin C. It aids hydration, balances electrolytes, improves digestion, and combats fatigue. Easy to make with oranges, sugar, lemon, mint, and soda; a tasty and healthy alternative to store-bought drinks.
Web Summary : घर का बना ऑरेंज सोडा एक ताज़ा गर्मी का पेय है, जो विटामिन सी से भरपूर है। यह हाइड्रेशन में मदद करता है, इलेक्ट्रोलाइट्स को संतुलित करता है, पाचन में सुधार करता है और थकान से लड़ता है। संतरे, चीनी, नींबू, पुदीना और सोडा के साथ बनाना आसान; यह स्टोर से खरीदे गए पेय का एक स्वादिष्ट और स्वस्थ विकल्प है।