Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मूगडाळ टिक्की खाऊ द्या मुलांना पोटभर आणि तुम्हीही खा मस्त! खमंग-पौष्टिक-सोपी रेसिपी

मूगडाळ टिक्की खाऊ द्या मुलांना पोटभर आणि तुम्हीही खा मस्त! खमंग-पौष्टिक-सोपी रेसिपी

try eating moongdal tikkis and you will love it! Delicious-nutritious-easy recipe : पौष्टिक रेसिपी आणि करायलाही सोपी. एकदा नक्की करा. नाश्त्यासाठी खा ही टिक्की.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2025 12:11 IST2025-06-14T12:11:17+5:302025-06-14T12:11:59+5:30

try eating moongdal tikkis and you will love it! Delicious-nutritious-easy recipe : पौष्टिक रेसिपी आणि करायलाही सोपी. एकदा नक्की करा. नाश्त्यासाठी खा ही टिक्की.

try eating moongdal tikkis and you will love it! Delicious-nutritious-easy recipe | मूगडाळ टिक्की खाऊ द्या मुलांना पोटभर आणि तुम्हीही खा मस्त! खमंग-पौष्टिक-सोपी रेसिपी

मूगडाळ टिक्की खाऊ द्या मुलांना पोटभर आणि तुम्हीही खा मस्त! खमंग-पौष्टिक-सोपी रेसिपी

पौष्टिक नाश्त्यासाठी छान सोपी रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. (try eating moongdal tikkis and you will love it! Delicious-nutritious-easy recipe)मूगडाळीची टिक्की हा पदार्थ दिसायला छान गुलाबी आणि चवीला एकदम मस्त आहे. पाहा कशी करायची ही टिक्की. 

साहित्य 
मूगडाळ, पनीर, गाजर, कोथिंबीर, सिमला मिरची, हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी पूड, लाल तिखट, जिरे पूड, आमचूर पूड, तांदूळ पीठ, बीट, बेसन, ओट्स, आलं, लसूण, तेल

कृती
१. मूगडाळ स्वच्छ धुवायची. किमान तीन तास तरी भिजत ठेवायची. पनीर छान किसून घ्यायचे. सिमला मिरची बारीक चिरुन घ्यायची. गाजर सोलायचे आणि किसून घ्यायचे. ओट्स भिजत घालायचे. ओट्सही किमान तासभर भिजवायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा तुकडा घ्यायचा. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करुन घ्यायची. हिरव्या मिरचीचीही पेस्ट तयार करायची. बीट उकडायचे आणि किसून घ्यायचे. 

२. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूगडाळ घ्यायची आणि वाटायची. पाणी न घालता वाटा. घट्ट व्हायला हवी. पातळ नको. जरा जाडच वाटा. मिक्सर बंद-चालू करुन वाटून घ्यायची. जाडसर वाटलेली डाळ एका खोलगट भांड्यात घ्यायची. त्यात किसलेले पनीर घालायचे. त्यात बारीक चिरेलेली सिमला मिरची घालायची. तसेच किसलेले गाजरही घालायचे. किसलेले बीट मिश्रणात घालायचे. भिजवलेले ओट्स घालायचे. 

३. आले- लसूण- हिरव्या मिरचीची पेस्ट त्यात घालायची. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर काळी मिरी पूड घालायची. जिरे पूड घालायची. आमचूप पूड घालायची. तसेच थोडे तांदळाचे पीठ घालायचे आणि थोडे बेसनही घालायचे. कोथिंबीर छान बारीक चिरायची. कोथिंबीरही घालायची. सगळे पदार्थ एकजीव करायचे. हाताने कुसकरायचे. घट्ट पीठ तयार करायचे आहे त्यामुळे पाणी घालू नका. भाज्यांना सुटणारे पाणी पुरेसे असते.

४. हाताला तेल लावायचे आणि पीठाचे गोळे हातात घेऊन त्यांना टिक्कीचा आकार द्यायचा. पॅन गरम करत ठेवायचा. त्यात थोडे तेल घालायचे. तेलावर एक एक करुन टिक्की लावायची. चांगली खरपूस परतून घ्यायची. एका बाजूने परतून झाल्यावर दुसर्‍या बाजूने परतायची. खमंग कुरकुरीत परतून झाल्यावर ताटात काढा आणि गरमागरम खा. सोबत चटणी घ्या.         

Web Title: try eating moongdal tikkis and you will love it! Delicious-nutritious-easy recipe