Join us

झणझणीत-चमचमीत-खमंग कांदा लसूण मसाला करण्याची पारंपरिक रेसिपी, उन्हाळ्यात करायलाच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 16:44 IST

Traditional recipe for spicy-spicy-spicy onion garlic masala : पदार्थ करताना त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातल्यावर चव दुप्पट होते. पाहा कसा कराल.

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचा मसाला वापरला जातो. विकतचे काही मसाले आपण वापरतोच मात्र घरोघरी खास मसाले केले जातात.(Traditional recipe for spicy-spicy-spicy onion garlic masala) घरच्या मसाल्याची चव जास्त छान लागते. घरोघरी गरम मसाला केला जातो. तसेच गोडा मसाला केला जातो. खानदेशी मसालाही लोकांना फार आवडतो. त्याप्रमाणे कांदा लसुण मसाला फार लोकप्रिय आहे. (Traditional recipe for spicy-spicy-spicy onion garlic masala)मस्त झणझणीत जेवण करताना हा मसाला वापरला जातो. कांदा लसुण मसाल्याला कोल्हापूरी मसाला असे ही म्हणतात. भाजी आमटी तसेच मिसळ करताना हा मसाला वापरला जातो. हा मसाला घरी करणे अगदीच सोपे आहे. एकदा करुन बघा पुन्हा विकतचा मसाला आवडणारच नाही.

१ किलोचा मसाला कराण्यासाठी साधारण पुढील प्रमाणे सामग्रीचे प्रमाण घ्या. 

लाल मिरची अर्धा किलो, बेडगी मिरची पाव किलो, अर्धा किलो कांदा, पाव किलो लसूण, जिरे, तीळ, खसखस, मोहरी, मेथी, चक्रीफुल, दालचिनी, लवंग, काळी मिरी, तमालपत्र, पाव किलो धने पाव किलो सुके खोबरे    

कृती१. एका कढईमध्ये चमचाभर तेल घ्या. त्यामध्ये लांब लांब चिरलेला कांदा घाला. मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर एका ताटामध्ये काढून घ्या.

२. त्याच कढईमध्ये आणखी थोड्या तेलात लसणाच्या पाकळ्या परतून घ्या. करपणार नाहीत याची काळजी घ्या. जरा खमंग झाल्या की ताटामध्ये काढून घ्या.

३. आता एका सुक्या कढईमध्ये बिना तेलाचे पदार्थ परतून घ्या. सुके खोबरे छान रंग बदले पर्यंत परता. नंतर त्याच कढईमध्ये खसखस घाला. तसेच धणे घाला. तमालपत्र घाला. लवंग घाला. चक्रीफुल घाला. तीळ घाला. दालचिनी घाला. काळी मिरी घाला. मेथीचे दाणे घाला. चवीपुरते मीठ घाला. सगळे मसाले छान खमंग परता. 

४. नंतर परतलेले मसाले गार करत ठेवा. गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या. पूड तयार करुन घ्या. परतलेला कांदा लसुण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओता. त्यामध्ये हळद घाला. मस्त वाटून घ्या. 

५. लाल मिरच्या वाटताना काळजी घ्या. जर काम कमी करायचे असेल तर लाल तिखट वापरा. बेडगी मिरची वाटून घ्या. त्याची पावडर करुन घ्या. लाल मिरचीही वाटून घ्या. 

६. दोन्ही मिरची पूड चाळून घ्या. त्यामध्ये वाटलेले खडे मसाले घाला. वाटलेली कांदा लसूण पेस्ट घाला. सगळं एकजीव करुन घ्या. जरा वेळ बाहेरच राहू द्या मस्त वाळवून घ्या. मग हवाबंद डब्यामध्ये भरा.        

टॅग्स :अन्नसमर स्पेशलपाककृतीकांदा