Lokmat Sakhi >Food > कोथिंबिरीची भाजी करण्याची पारंपारिक कृती, अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सुगंधी भाजी करा नक्की

कोथिंबिरीची भाजी करण्याची पारंपारिक कृती, अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सुगंधी भाजी करा नक्की

Traditional recipe for making coriander sabjii, a very nutritious and tasty aromatic vegetable कोथिंबीरीची भाजी करायला सोपी चवीला मस्त. पाहा कशी कराल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 16:23 IST2025-04-24T16:22:18+5:302025-04-24T16:23:20+5:30

Traditional recipe for making coriander sabjii, a very nutritious and tasty aromatic vegetable कोथिंबीरीची भाजी करायला सोपी चवीला मस्त. पाहा कशी कराल.

Traditional recipe for making coriander sabjii, a very nutritious and tasty aromatic vegetable | कोथिंबिरीची भाजी करण्याची पारंपारिक कृती, अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सुगंधी भाजी करा नक्की

कोथिंबिरीची भाजी करण्याची पारंपारिक कृती, अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सुगंधी भाजी करा नक्की

आपण भाजीमध्ये कोथिंबीर घालतो. पण कधी कोथिंबीरीची भाजी खाल्ली आहे का? कोथिंबीर हा पदार्थ गार्निशींगसाठी वापरला जातो. (Traditional recipe for making coriander sabjii, a very nutritious and tasty aromatic vegetable)पण कोथिंबीरीला स्वत:ची वेगळी छान अशी चव असते. वडी करण्यासाठी कोथिंबीर वापरली जाते. तसेच कोथिंबि‍रीचे वरण फार छान लागते. कोथिंबीर फक्त चव वाढवणारा पदार्थ नसून कोथिंबीर पौष्टिक आहे. रोजच्या आहारामध्ये कोथिंबीर असायला हवी. (Traditional recipe for making coriander sabjii, a very nutritious and tasty aromatic vegetable)कधी कोणती भाजी करावी हे सुचत नसेल तर कोथिंबीरीची झटपट भाजी करा.    

साहित्य
कोथिंबीर, कांदा, लसूण, मीठ, तेल, आलं, पाणी, मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, बेसन, हिंग , हिरवी मिरची, कडीपत्ता

कृती
१. ताजी कोथिंबीरीची जुडी घ्या. कोथिंबीर  शिजल्यावर आकसते त्यामुळे भरपूर वापरा. जरा निवडून घ्या पण कोथिंबीरीच्या दांड्याही वापरा दांड्यांसकट कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्या. आलं मस्त किसून घ्या. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या आणि चिरुन किंवा मग ठेचून घ्या. ठेचलेल्या लसणाची चव जास्त छान लागेल.

२. एका कढईमध्ये चमचाभर तेल गरम करत ठेवा. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरीचे दाणे टाका. मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये चमचाभर जिरं घाला. तसेच कडीपत्याची पाने घाला. त्यामध्ये किसलेले आले घाला. छान परता मग त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. लसणाच्या पाकळ्या घाला. हिंग घाला. मस्त बारीक चिरलेला कांदा घाला. सगळं मिश्रण मस्त खमंग परतून घ्या. 

३. कांदा छान गुलाबी झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. कोथिंबीर थोडी परतल्यावर त्यावर झाकण ठेवा आणि एक वाफ काढा. कोथिंबीरीचा रंग जरा बदलतो तसेच अगदी मऊ होते. कोथिंबीर शिजल्यावर त्यामध्ये दोन चमचे बेसनाचे पीठ घाला. पीठ सुकेच घाला. चवीपुरते मीठ घाला. हळद घाला. तसेच लाल तिखट घाला. सगळं छान मिक्स करुन घ्या. भाजी सतत ढवळत राहा. त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घाला. भाजी जरा मोकळी होईल छान हिरवी पिवळी अशी भाजी दिसायला लागली की गॅस बंद करा.      

Web Title: Traditional recipe for making coriander sabjii, a very nutritious and tasty aromatic vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.