शेपूच नाव जरी काढलं तरी अनेकांचे नाक लगेच मुरडते.(Maharashtrian Food ) शेपूची भाजी अनेकांना आवडत नाही. परंतु, आरोग्यासाठी ही अधिक फायदेशीर मानली जाते. शेपूमध्ये व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मँग्नेशियम अधिक प्रमाणात असते.(How to make crispy and tasty shepu vadi ) जे आपले पचन सुधारण्यास मदत करते. शेपूची फक्त भाजीच नाही तर त्यांच्या वड्या, पराठा आणि विविध प्रकार केले जातात. त्यातील एक पारंपरिक पदार्थ शेपूची फळे.(shepu benefits)
शेपूची फळे ही पारंपरिक रेसिपी महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात कर्नाटकमध्ये बनवली जाते. महाराष्ट्रात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात शेपू आणि त्याच्या कोवळ्या शेंगा खाल्ल्या जातात.(Traditional Food) घरातील मंडळी शेपूची भाजी खात नसतील तर या पद्धतीने शेपूची फळे ट्राय करुन पाहा. याच्या चवीमुळे सगळेच आवडीने हा पदार्थ खातील. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.(Recipe)
Shravan Special : साबुदाणा खाऊन कंटाळलात? ५ उपवासाचे पदार्थ खा, अपचन-पित्ताचा त्रासही होणार नाही
साहित्य
बारीक चिरलेली शेपू - १ वाटी
गव्हाचे पीठ - २ १/२ वाटी
बेसनाचे पीठ - २ चमचे
हळद - अर्धा चमचा
जिरे - १ चमचा
मीठ - चवीनुसार
ओवा - १ चमचा
आलं-लसणू- मिरची पेस्ट - १ चमचा
पाणी - आवश्यकतेनुसार
तेल - २ चमचे
मोहरी - १ चमचा
हिंग - अर्धा चमचा
हळद - अर्धा चमचा
लाल मसाला - अर्धा चमचा
कढीपत्त्याची पाने - १० ते १२
दाण्याचा कूट - २ ते ३ चमचे
कृती
1. सगळ्यात आधी शेपू धुवून ती बारीक चिरून घ्या. आता एका मोठ्या ताटात गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ, हळद, जिरे, मीठ आणि ओवा हातावर चोळून पिठात घाला. पीठ हाताने चांगले मिक्स करुन घ्या. त्यात चिरलेला शेपू घालून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये आलं-लसूण- मिरचीची पेस्ट घाला. पीठ पुन्हा एकदा नीट मिक्स करा. वरुन थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठाला एकसारखे करण्यासाठी थोडे तेल घालून पुन्हा मळा.
2. तयार पीठाचे गोळे घेऊन वड्यांसारखे हाताने थापा. त्यानंतर एका टोपात पाणी घालून त्यात चाळणी ठेवा. त्याला तेल लावून तयार वडे त्यात ठेवा. १० मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर सुरीच्या मदतीने वडे शिजले आहे की नाही ते तपासा.
3. वडे थंड झाल्यानंतर अर्धे कट करा. यानंतर कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यात मोहरी, हिंग, हळद , लाल मसाला आणि कढीपत्त्याची पाने घालून तडतडू द्या. वरुन तयार केलेले शेपूची फळे घालून चांगले मिक्स करा. सगळ्यात शेवटी वरुन दाण्याचा कूट घालून परतवून घ्या. दही किंवा कढीसोबत सर्व्ह करा.