खरवस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते चिकाचे घट्ट दूध आणि त्यापासून बनवलेली मऊ वडी. पण अनेकदा चिकाचे दूध वेळेवर उपलब्ध होत नाही किंवा काहींना दुधाच्या पदार्थांची अॅलर्जी असते. अशावेळी कमी साहित्यात होणारा झटपट नारळाचा खरवस हा सोपा पर्याय आहे.(Traditional Konkani style coconut milk kharvas) नारळाच्या दुधापासून तयार होणारा हा पदार्थ चवीला इतका मऊ आणि मलाईदार असतो की तोंडात टाकताच विरघळतो. कोकणी पद्धतीच्या या गोड पदार्थाला कोकोनट पुडिंग असंही म्हटलं जातं.(Healthy summer dessert recipes in Marathi) उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा जेव्हा आपल्याला काहीतरी हलकं आणि थंडावा देणारं गोड खाण्याची इच्छा असते, तेव्हा नारळाचा खरवस खाता येईल.(Soft and melt-in-mouth coconut vadi recipe) यामध्ये दुधाचा एकही थेंब न वापरता फक्त नारळाच्या चिकाचा वापर केला जातो, ज्यामुळे तो अधिकच पौष्टिक बनतो. हा पदार्थ बनवण्यासाठी फारसा वेळही लागत नाही. पाहूया नारळाचा मऊसुत खरवस बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
कुकरमध्ये कोणती डाळ किती शिट्ट्यात शिजते, १-२ की ४? उन्हाळ्यात झटपट स्वयंपाकासाठी ४ टिप्स
साहित्य
ओल्या नारळाचा किस - २ वाटी कॉर्नफ्लोअर - अर्धी वाटीसाखर - अर्धी वाटी वेलची पूड - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी ओला नारळ किसून तो मिक्सरला लावून घ्या. नंतर गाळणीने किंवा सुती कापडाने दाबून त्याचे घट्ट दूध काढून घ्या. असं साधारण दोन ते तीन वेळा केल्यास नारळाचे दूध निघेल.
2. त्यानंतर एका भांड्यात नारळाचे दूध, कॉर्नफ्लोअर आणि पिठीसाखर घालून एकत्र करुन गुठळ्या होणार नाही याची काळजी घेत ढवळा.
3. हे मिश्रण मध्यम आचेवर गॅसवर ठेवा आणि सतत ढवळत राहा. मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागले की त्यात वेलची पूड घाला.
4. एका थाळीला थोडे तूप लावून त्यात ते मिश्रण ओता आणि वरुन पिस्त्याचे काप घाला. नंतर थंड झाल्यावर १ ते २ तास सेट होण्यास ठेवा.
5. पूर्णपणे सेट झाल्यावर त्याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या पाडा. आपला मऊसुत नारळाचा खरवस तयार होईल.
Web Summary : Make delicious coconut milk Kharvas quickly with this simple recipe. A perfect, soft, and melt-in-your-mouth Konkani dessert for summer, using coconut milk, cornflour, sugar, and cardamom. This healthy treat requires no milk and is ready in minutes.
Web Summary : इस आसान रेसिपी से स्वादिष्ट नारियल दूध का खरवस जल्दी बनाएं। नारियल का दूध, कॉर्नफ्लोर, चीनी और इलायची का उपयोग करके गर्मियों के लिए एक आदर्श, नरम और मुंह में पिघल जाने वाला कोंकणी मिठाई। इस स्वस्थ व्यंजन में दूध की आवश्यकता नहीं होती है और यह मिनटों में तैयार हो जाता है।