आपल्या शरीरात असाही बॅक्टेरिया असतो जो शरीरासाठी चांगला असतो. शरीरातील संस्थांचे काम सुरळीत चालण्यासाठी हा बॅक्टेरिया मदत करतो. (Traditional Kaanji Recipe- Probiotic Drink For Summers )खास म्हणजे पचनसंस्थेसाठी हा बॅक्टेरिया गरजेचा असतो. बॅक्टेरिया म्हटले की वाईटच असतो. आपल्या शरीरामध्ये रोगराई पसरवतो असे आपल्याला वाटते. मात्र तज्ञ सांगतात, आपल्या शरीरात भरपूर बॅक्टेरिया असतात. त्यामध्ये वाईट बॅक्टेरिया असतोच पण चांगलाही असतो. (Traditional Kaanji Recipe- Probiotic Drink For Summers )या शरीरासाठी फायदेशीर ठरणार्या बॅक्टेरियाला प्रो बायोटिक असे म्हटले जाते. आतड्यांसाठीसुद्धा प्रो बायोटिक महत्त्वाचे असतात.
आपण दही खातो. दही हे प्रो बायोटिक आहे. त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर असते. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी प्रो बायोटिक जादू प्रमाणे काम करते. (Traditional Kaanji Recipe- Probiotic Drink For Summers )तसेच शरीराला दिवसभर कार्यशील राहण्यासाठी मदत करते. उत्तर भारतामध्ये प्रो बायोटिक ड्रिंक म्हणून कांजी प्यायली जाते. कांजी हे फरमेंटेड पेय आहे. चवीला तर मस्तच लगते. एनएलपी मार्गदर्शक राम वर्मा सांगतात की, ते नाश्त्याच्याऐवजीसुद्धा कांजी पितात. पोटाला आधार मिळतो.
कांजी तयार करणे सोपे आहे. एकदा तयार करून ठेवली की बरेच दिवस खराब होत नाही.
साहित्य :
बीट, गाजर, मीठ, जिरे पूड, हिरवी मिरची, पाणी
प्रमाण दिड लिटर पाण्याची कांजी तयार करण्यासाठी १ बीट, १ गाजर, २ ते ३ मिरच्या एवढं प्रमाण अगदी बरोबर आहे.
कृती
१. एका काचेच्या बरणीमध्ये दिड लिटर पाणी घ्या. बरणी अगदी स्वच्छ असू दे.
२. एक बीट आणि एक गाजर चिरून घ्या. ३ ते ४ मध्यम तिखट असलेल्या मिरच्या चिरून घ्या.
३. सगळं काचेच्या बरणीतील पाण्यामध्ये घाला. त्यामध्ये चमचाभर मीठ, चमचाभर जिरे पूड घाला. त्या बरणीचे तोंड स्वच्छ फडक्याने बंद करा. दोन दिवस उन्हात ठेवा. नंतर त्यामधील तुकडे काढून घ्या. आणि फ्रिजमध्ये ठेवा. गार झाले की थंडगार अशी कांजी प्या.
रोज एक पेला भरून कांजी प्यावे असे राम वर्मा यांनी सुचवले आहे. शरीरासाठी कांजी फारच फायदेशीर आहे. तिन्ही ऋतूंमध्ये शरीराला चालणारे असे हे पेय आहे. उन्हाळ्यासाठी कांजी तयार करून फ्रिजमध्ये ठेवा. जास्त दिवस टिकत जरी असली तरी पटापट संपवायची.