Lokmat Sakhi >Food > फक्त १० मिनिटांत करा चटपटीत टोमॅटो चटणी! डोसा, पोळी, पराठ्यासोबत खायला एकदम बेस्ट 

फक्त १० मिनिटांत करा चटपटीत टोमॅटो चटणी! डोसा, पोळी, पराठ्यासोबत खायला एकदम बेस्ट 

Food And Recipe: घरात जर कधी भाजी नसेल तर अशावेळी ही चटपटीत टोमॅटो चटणी तुम्ही करू शकता..(tomato chutney recipe in just 10 minutes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 12:35 IST2025-06-18T12:34:38+5:302025-06-18T12:35:55+5:30

Food And Recipe: घरात जर कधी भाजी नसेल तर अशावेळी ही चटपटीत टोमॅटो चटणी तुम्ही करू शकता..(tomato chutney recipe in just 10 minutes)

tomato chutney recipe in just 10 minutes, how to make tomato chutney, easy and simple recipe of making tomato chutney  | फक्त १० मिनिटांत करा चटपटीत टोमॅटो चटणी! डोसा, पोळी, पराठ्यासोबत खायला एकदम बेस्ट 

फक्त १० मिनिटांत करा चटपटीत टोमॅटो चटणी! डोसा, पोळी, पराठ्यासोबत खायला एकदम बेस्ट 

Highlightsमिळमिळीत जेवणालाही छान चव आणणाऱ्या या चटपटीत टोमॅटो चटणीची सोपी रेसिपी....

भाजी, आमटी, वरण असे पदार्थ कितीही चटकदार झाले तरीही जोपर्यंत या पदार्थांसोबत पानाच्या डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, लोणचं असे पदार्थ येत नाहीत तोपर्यंत जेवणाची मजा काही रंगत नाही. तुम्ही ही चटणी लव्हर असाल तर टोमॅटोची ही अगदी सोप्या पद्धतीने होणारी चटपटीत चटणी करून बघाच (how to make tomato chutney?). एखाद्या वेळी घरात जर कोणतीच भाजी नसेल तर २ टोमॅटो आणि १ कांदा घेऊन ही चटपटीत चटणी करता येईल (tomato chutney recipe in just 10 minutes). मिळमिळीत जेवणालाही छान चव आणणाऱ्या या चटपटीत टोमॅटो चटणीची बघा एकदम सोपी रेसिपी...(easy and simple recipe of making tomato chutney) 

टोमॅटो चटणी कशी करावी?

 

साहित्य 

२ मध्यम आकाराचे टोमॅटो

१ लहान आकाराचा कांदा 

५ ते ६ लसूण पाकळ्या 

Home Decor: छाेटंसं घरही दिसेल प्रशस्त आणि मोठ्ठं! ५ गोष्टी करा, तुमचं घरही दिसेल आलिशान सुंदर

१ इंच आल्याचा तुकडा 

१ चमचा गूळ 

चवीनुसार मीठ 

१ चमचा लाल तिखट आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे आणि कडिपत्ता

 

कृती 

टोमॅटो स्वच्छ धुऊन पुसून कोरडे करून घ्या आणि त्याचे मोठे मोठे काप करा. 

कांदाही चिरून त्याचेही मोठे मोठे काप करा. आता टोमॅटो, कांदा, जिरे, लसूण, आलं, जिरे आणि मीठ हे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि पाणी न घालता त्याची अगदी बारीक प्युरी करून घ्या. 

आमिर खान म्हणतो- नुसताच व्यायाम करून उपयोग नाही, वजन घटविण्यासाठी 'ही' गोष्ट खूप गरजेची

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तेल घालून खमंग फोडणी करून घ्या. 

आता या फोडणीमध्ये आपण तयार केलेली कांदा- टोमॅटोची प्युरी, गूळ, लाल तिखट घालून ६ ते ७ मिनिटांसाठी मध्यम आचेवर चांगली परतून घ्या. 

चटणीतलं पाणी थोडसं कमी झालं की गॅस बंद करा. तुमची चटपटीत चवदार टोमॅटो चटणी झाली तयार.



 

Web Title: tomato chutney recipe in just 10 minutes, how to make tomato chutney, easy and simple recipe of making tomato chutney 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.