Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऊन तापू लागताच भूक कमी झाली, करा १० मिनिटांत टोमॅटोची चटणी- चमचमीत चटणी भाजीपेक्षा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 15:46 IST

Tomato Chutney Recipe: नेहमीच्याच भाज्या करण्याचा- खाण्याचा कंटाळा आला? १० मिनिटांत करा तोंडाला चव आणणारी चटपटीत टोमॅटो चटणी (how to make tomato chutney in 10 minutes?)

त्याच त्या आपल्या नेहमीच्याच भाज्या खाऊन बऱ्याचदा खूप कंटाळा येतो. कधी कधी तर अगदी त्या भाज्या नकोशा वाटायला लागतात. काहीतरी वेगळं खावं वाटतं. किंवा बऱ्याचदा असं होतं की घरात आपले नेहमीचे कांदे, टोमॅटो याशिवाय अन्य भाजी नसते. असं काही झालं तर अशावेळी झटपट करता येणारी टोमॅटोची चटणी खाऊन पाहा (instant tomato chutney recipe). ही चटणी करायला खूप सोपी आहे आणि अगदी मोजक्या साहित्यात करता येते (how to make tomato chutney in 10 minutes?). बघा नेमकी कशी करायची..(tomato chutney recipe)

टोमॅटो चटणी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ चमचा तेल आणि फोडणीसाठी लाल मिरच्या, मोहरी, हिंग, जिरे

२ टोमॅटो आणि १ कांदा

फक्त ३ सेकंदात ओळखा साडीची अस्सल सिल्कची की सिंथेटिक? महाग हातमाग सिल्क साडी घेताना ‘एवढंच’ करा

६ ते ७ लसूण पाकळ्या आणि २ हिरव्या मिरच्या

२ ते ३ चमचे उडीद डाळ आणि ४ ते ५ चमचे शेंगादाणे

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून साखर

 

कृती

कांदा आणि टोमॅटो थोडे जाडसर चिरून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई गरम करून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर टोमॅटो, कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे असं सगळं एकेक करून खमंग परतून घ्या. 

केसांना 'या' पद्धतीने लावा मोहरीचं तेल, म्हातारपणीही केस राहतील लांब-काळेभोर-दाट

परतून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यात चवीनुसार तिखट, मीठ घालून  बारीक पेस्ट करून घ्या. यानंतर छोटी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये वाळलेल्या लाल मिरच्या, उडदाची डाळ, हिंग, मोहरी घालून फोडणी करा. ही फोडणी टोमॅटोच्या चटणीमध्ये वरतून घाला. थोडीशी साखर घालून सगळी चटणी हलवून घ्या. चटपटीत चटणी तयार. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the heat with this 10-minute tomato chutney recipe!

Web Summary : Tired of the usual vegetables? This quick tomato chutney is a delicious alternative. Made with simple ingredients like tomato, onion, garlic, and spices, it's ready in minutes. Perfect as a side dish, this chutney is flavorful and easy to make, offering a welcome change to your meals.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.टोमॅटो