दिवाळीच्या दिवसांमध्ये नातलग, मित्रमंडळी यांना बऱ्याचदा दिवाळीच्या फराळासाठी तसेच जेवणासाठी आवर्जून घरी बोलावलं जातं. यानिमित्ताने भेटीगाठी होतात. गप्पा रंगतात. या गप्पांना मग दिवाळीच्या खुसखुशीत फराळाची आणि चवदार जेवणाचीही जोड मिळते. आता पाहुणे घरी जेवायला येणार म्हटल्यावर आपण त्यांच्यासाठी काही खास मेन्यू नक्कीच करतो. आता तुमचा मेन्यू कोणताही असला तरी त्यासोबत पाहूण्यांना एका खास रेसिपीने केलेली टोमॅटोची चटणी नक्की वाढा. ही चटणी जेवणात तोंडी लावायला असेल तर जेवणाची मजा नक्कीच वाढेल आणि पाहूणे दोन घास जास्तच जेवतील (how to make tomato chutney?). ही चटणी पोळी, पराठा, डोसा, उत्तप्पा, पुऱ्या यांच्यासोबत लावून खायलाही छान लागते.(easy recipe of red tomato chutney)
लाल टोमॅटोची चटपटीत चटणी
रेसिपी
२ ते ३ लाल टोमॅटो
७ ते ८ लसूण पाकळ्या
४ ते ५ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कपडे, दागिने मॅचिंग- मॅचिंग घालण्याची फॅशन आता गेली! पाहा कपड्यांच्या रंगानुसार कसे निवडायचे दागिने
चिमूटभर हळद
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि कडिपत्ता
चवीनुसार मीठ
२ टीस्पून गूळ
कृती
टोमॅटो मधोमध चिरून त्यांचे दोन मोठे भाग करून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यामध्ये तेल घालून टोमॅटोचे मोठे काप, मिरच्या, लसूण असं सगळं वाफवून घ्या. थोड्या थोड्या वेळाने टोमॅटो, मिरच्या, लसूण आलटून पालटून घ्या आणि सगळीकडून खमंग परतून घ्या.
पारंपरिक पद्धतीने केलेले रव्याचे पाकातले लाडू, पाक कच्चा राहण्याचं टेन्शनच नाही, घ्या रेसिपी
यानंतर गॅस बंद करा. टोमॅटो थंड होऊ द्या. त्यानंतर टाेमॅटो, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, गूळ आणि थोडेसे जिरे असं सगळं मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या.
गॅसवर एक छोटी कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्या. आता मिक्सरमधून फिरवलेली चटणी एका भांड्यात काढा. त्यात चवीनुसार मीठ घाला आणि वरतून तयार केलेली फोडणी घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की चटपटीत टोमॅटो चटणी तयार.