Lokmat Sakhi >Food > धान्य साठवताना कीड लागू नये म्हणून त्यात ठेवा केमिकल फ्री ५ गोष्टी, अळ्या-कीडे होणार नाहीत

धान्य साठवताना कीड लागू नये म्हणून त्यात ठेवा केमिकल फ्री ५ गोष्टी, अळ्या-कीडे होणार नाहीत

To prevent pests from infesting grains while storing them, keep 5 chemical-free things in grains, home remedies : धान्य अजिबात खराबहोणार नाही. पाहा काय करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 15:58 IST2025-09-09T15:52:50+5:302025-09-09T15:58:20+5:30

To prevent pests from infesting grains while storing them, keep 5 chemical-free things in grains, home remedies : धान्य अजिबात खराबहोणार नाही. पाहा काय करायचे.

To prevent pests from infesting grains while storing them, keep 5 chemical-free things in grains, home remedies | धान्य साठवताना कीड लागू नये म्हणून त्यात ठेवा केमिकल फ्री ५ गोष्टी, अळ्या-कीडे होणार नाहीत

धान्य साठवताना कीड लागू नये म्हणून त्यात ठेवा केमिकल फ्री ५ गोष्टी, अळ्या-कीडे होणार नाहीत

धान्य हे घरातील रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे. इतर पदार्थ केले तरी रोज गहू, तांदूळ, विविध डाळी आपण वापरतोच. हे पदार्थ घरी असतातच. धान्ये साठवणीचा पदार्थ आहे. रोज जाऊन आणला जात नाही. (To prevent pests from infesting grains while storing them, keep 5 chemical-free things in grains, home remedies )एकदाच महिन्याचे राशन भरले जाते. मात्र त्याची योग्य साठवण केली नाही तर त्याला पटकन कीड लागते किंवा ते खराब होते. धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही साधे पण उपयुक्त उपाय घरच्या घरी करता येतात. महिनोंमहिने धान्याला काहीही होणार नाही.

सर्वप्रथम धान्य खरेदी केल्यानंतर ते थेट डब्यात न ठेवता उन्हात २-३ तास पसरवून वाळवावे. किमान दोन दिवस तरी त्याला ऊन दाखवा. धान्यातील किंचितही ओलसरपणा कीड निर्माण करतो. डबे भरायच्या आधी ते नीट स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. झाकण घट्ट बसणारे स्टील, काचेचे किंवा फूड-ग्रेड प्लास्टिकचे हवाबंद डबे वापरले तर धान्य जास्त काळ छान राहते. डबे नेहमी कपाटात उंचावर किंवा रॅकवर ठेवावेत, थेट जमिनीवर ठेवणे टाळा.

धान्याला किड लागू नये म्हणून काही नैसर्गिक उपाय अतिशय प्रभावी ठरतात. डब्यात लसूण पाकळ्या ठेवणे फायद्याचे ठरते. तसेच कडुनिंबाची पाला वापरता येतो.  लवंग साखरेतही ठेवता येते. तसेच इतरही धान्यांत ठेवता येते. सुकी लाल मिरची धान्याच्या खास म्हणजे डाळींच्या डब्यात ठेवता येते. तमालपत्र किंवा दालचिनीचे छोटे तुकडे ठेवले तर धान्य सुरक्षित राहते. हे पदार्थ सुती कापडाच्या छोट्या पोटलीत बांधून ठेवले तर धान्याची चव आणि वास बदलत नाही. डबे दर महिन्याला उघडून धान्य ढवळून घ्यावे, म्हणजे किड लागण्याची शक्यता कमी होते तसेच त्यात काही असेल तर कळते.

साठवणूक करताना जुने आणि नवे धान्य एकत्र करू नये. आधी जुनं संपवून मगच नवं भरावं. मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केल्यास ते लहान-लहान डब्यांमध्ये विभागून ठेवावं, त्यामुळे प्रत्येक वेळी मोठा साठा उघडण्याची गरज पडत नाही आणि त्यात अळी, कीड पडण्याची शक्यता एकदम कमी होते.

धान्य ज्या ठिकाणी ठेवले आहे तिथे स्वच्छता आणि कोरडेपणा राखणेही तितकेच आवश्यक आहे. कपाटाभोवती कीड, झुरळे, उंदीर यांचा त्रास असेल तर त्यांची वेळीच खबरदारी घ्यावी. डब्यातील धान्यात वास, रंग किंवा कीड दिसली तर तो डबा वेगळा ठेवून लगेच उन्हात वाळवून घ्यावा आणि डबा परत निर्जंतुक करून वापरावा.

Web Title: To prevent pests from infesting grains while storing them, keep 5 chemical-free things in grains, home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.