Food for guts health : सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. जर तुम्ही सकाळचा नाश्ता टाळत असाल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण सकाळच्या नाश्त्यातून शरीराला भरपूर पोषण मिळतं. तसेच दिवसभर काम करण्याची एनर्जीही मिळते. सोबतच सकाळच्या नाश्त्यामध्ये जर फायबर असलेले पदार्थ खाल तर आतड्यांची सफाई होण्यासही मदत मिळते. आतड्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. अशात आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि त्यांची सफाई करण्यासाठी सकाळी नाश्त्यात काय खाणं फायदेशीर ठरू शकेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सकाळी नाश्त्यात काय खावं?
ग्रीक दही
ग्रीक दह्यामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात, जे गुड बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करतात. हे बॅक्टेरिया मायक्रोबायोम संतुलित ठेवण्यास मदत करतात. यानं तुमची इम्यूनिटी मजबूत होते आणि आतड्यांवरील सूजही कमी होते. जर ग्रीक दही तुम्ही साखर न टाकता खाल तर याचे फायदे दुप्पट मिळतील. दह्यातील पोषण वाढवण्यासाठी तुम्ही दह्यात ताजी फळं, ड्रायफ्रूट्स आणि मध टाकून खाऊ शकता.
चिया सीड्स
चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पचन तंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते. चिया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडही असतं, ज्यानं सूज कमी होते. नाश्त्यात चिया सीड्स खाल तर पोट साफ होण्यासही मदत मिळते.
ओट्स, बेरीज आणि अळशी बिया
या तिन्ही बियांमध्ये डायटरी फायबर असतं, जे बॅड कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास मदत करतं. या तिन्ही गोष्टींमुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. पोटात गुड बॅक्टेरिया वाढतात. हे खाण्यासाठी ओट्स अळशीच्या पावडरमध्ये टाकून खाऊ शकता. यानं फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड मिळेल.
हिरव्या पालेभाज्या आणि आले
हिरव्या पालेभाज्या आणि आले टाकून स्मूदी तयार करून खाऊ शकता. हे खाल्ल्यास शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतील. यात फायबर आणि आवश्यक पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. सोबतच यात सूज कमी करणारे गुणही असतात. यानं आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत मिळते.