Join us
Daily Top 2Weekly Top 5

दह्यावर पाण्याचा तरंग- चवीलाही आंबट? विरजण लावण्यासाठी ४ टिप्स- मिळेल घट्ट कवडीसारखे पांढरेशुभ्र दही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2026 12:53 IST

Traditional ways to set thick curd: Tips for thick curd at Home: कवडीसारखं घट्ट दही जमवण्यासाठी ४ टिप्स पाहूया.

उन्हाळ्यात भारतीय जेवणात दह्याचा अविभाज्य भाग आहे. या दिवसांत तर ताक, लस्सी किंवा साध्या दह्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही. पण अनेकदा घरी दही लावताना त्यावर पाण्याचा तरंग राहतो किंवा चवीला खूपच आंबट लागते.(Tips for thick curd at Home) दह्यावर पाण्याचा थर साचला की त्याची चव आणि पोत दोन्ही बिघडतात. अनेकांना प्रश्न पडतो की, बाजारात मिळणारे दही इतके घट्ट आणि वडीसारखे कसे असते? (Traditional ways to set thick curd)दुधाचे तापमान, विरजणाचे प्रमाण आणि ते किती वेळ उबदार ठिकाणी ठेवले जाते, यावर दह्याचा दर्जा अवलंबून असतो. जर दूध योग्य प्रकारे तापवले नाही किंवा विरजण जास्त प्रमाणात घातले तर दही आंबट होण्याची शक्यता असते.(Prevent curd from becoming sour) घरच्या दह्यावर मलईदार पिवळसर साय असावी आणि ते कापसासारखे पांढरे शुभ्र दही हवे असेल तर अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणं जास्त गरजेच आहे. कवडीसारखं घट्ट दही जमवण्यासाठी ४ टिप्स पाहूया. 

आई-आजीच्या जुन्या पैठणी साडीचा शिवा पार्टीवेअर ड्रेस- ५ ट्रेडिंग पॅटर्न, इंडो-वेस्टन ड्रेसचा स्वस्तात- मस्त पर्याय

1. दही घट्ट होण्यासाठी दूध चांगले उकळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध उकळताना त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि दूध दाट होते. दूध उकळून झाल्यानंतर ते थंड करु नका. दही लावण्यासाठी दूध कोमट असायला हवे. जास्त गरम दुधाच विरजण लावल्यास दही पाणीदार आणि लवचिक होते. 

2. अनेकदा आपण दुधात विरजण टाकून ते तसेच सोडून देतात. पण दह्याचे विरजण लावल्यानंतर चमच्याने ते दूध चांगले फेसाळून घ्या आणि वरुन खाली दोन-तीन वेळा ओता. यामुळे विरजण दुधात सर्वत्रसारखे पसरते आणि दह्याला एकसारखा घट्टपणा येतो. उन्हाळ्यात दह्याचे विरजण कमी वापरावे, कारण उष्णतेमुळे आंबटपणा लवकर वाढतो. 

3. जर आपल्याला बाजारात मिळणारे घट्ट दही हवे असेल तर मातीच्या भांड्याचा वापर करा. मातीची भांडी अतिरिक्त पाणी शोषून घेतात. ज्यामुळे दही नैसर्गिकरित्या दाट आणि मलाईदार होते. मातीच्या भांड्यात लावलेल्या दह्याची चव आणि सुगंधही खूप छान येतो. 

4. आपल्याला दही लगेच लावायचे असेल किंवा दूध विरजणानंतर सेट होत नसेल तर त्यात एक देठ असलेली मिरची मधोमध टाकून ठेवा. मिरचीमधील एन्झाइम्स दह्याला घट्ट होण्यास मदत करतात. दही लागल्यानंतर त्यातील मिरची बाहेर काढून टाका. ही ट्रिक थंड वातावरणात चांगली असते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स