Join us

९० टक्के महिलांना मायक्रोवेव्हचे 'हे' उपयोग माहितीच नाहीत, मायक्रोवेव्ह स्मार्ट पद्धतीने वापरण्याच्या ५ टिप्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 15:27 IST

Kitchen Tips For Using Microwave: मायक्रोवेव्ह आता बहुतांश घरांमध्ये आहे. पण बऱ्याच जणांना त्याचा योग्य वापर कसा करावा हेच समजत नाही.(tips and tricks to use microwave smartly)

ठळक मुद्देया पद्धतीने जर मायक्रोवेव्ह वापरले तर गॅसची सुद्धा खूप बच होते आणि महिनाभर पुरणारं सिलेंडर नक्कीच ८ दिवस जास्त चालतं. 

काही वर्षांपुर्वीपर्यंत फक्त गॅसवर काम केलं जायचं. पण आता मात्र मायक्रोवेव्ह, इंडक्शन अशी बरीच उपकरणं आपल्या मदतीला आली आहेत. मायक्रोवेव्ह हे असं उपकरण आहे जे तुमच्या स्वयंपाकातल्या अनेक गोष्टी सोप्या करू शकतं. पण पाणी गरम करणे किंवा चहा, कॉफी, दूध गरम करून घेणे किंवा रोजचं अन्न गरम करून घेणे याव्यतिरिक्त अनेक जण त्याचा म्हणावा तसा उपयोग करून घेतच नाहीत (Kitchen Tips for using microwave). तुमचंही असंच होत असेल त मायक्रोवेव्हच्या मदतीने झटपट होणारी ही काही कामं बघा आणि अतिशय स्मार्ट पद्धतीने मायक्रोवेव्ह वापरा..(tips and tricks to use microwave smartly)

 

मायक्रोवेव्ह अधिक स्मार्टपणे वापरण्यासाठी खास टिप्स..

१. पराठा किंवा भाजीसाठी बटाटे उकडायचे असतील तर ते स्वच्छ धुवा आणि मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्या. जेवढे बटाटे असतील तेवढ्या मिनिटांचा टाईम सेट करा. बटाटे छान उकडले जातात.

भोगीची मिक्स भाजी करताना 'हे' पदार्थ आवर्जून टाका, भाजी होईल चमचमीत- घ्या चवदार रेसिपी 

२. २ ते ३ मिनिटांत तुम्ही डाळवं भाजून मायक्रोवेव्हमध्ये त्याचे फुटाणे करू शकता. शेंगदाणे भाजण्यासाठीही मायक्रोवेव्ह खूप उपयुक्त ठरतं.

३. सूप करण्यासाठी किंवा भाज्यांच्या ग्रेव्हीसाठी टोमॅटोची सालं काढायची असतील तर टोमॅटोला अर्धवट दोन छेद द्या आणि ते मायक्रोवेव्हमध्ये ३० ते ३५ सेकंदासाठी ठेवा. झटपट सालं निघून जातील.

 

४. रवा किंवा दलिया भाजून घेण्यासाठीही मायक्रोवेव्हचा खूप चांगला उपयोग करता येतो.

दिवसाची सुरुवात ३ पदार्थ खाऊन करा! वजन मुळीच वाढणार नाही, राहाल एकदम फिट

५. साबुदाणा भाजण्यासाठीही मायक्रोवेव्ह वापरा. खूप कमी वेळात साबुदाणा छान भाजला जाईल. या पद्धतीने जर मायक्रोवेव्ह वापरले तर गॅसची सुद्धा खूप बच होते आणि महिनाभर पुरणारं सिलेंडर नक्कीच ८ दिवस जास्त चालतं. 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्ससुंदर गृहनियोजनहोम अप्लायंस