Lokmat Sakhi >Food > बरेच आठवडे फ्रेश राहील आलं-लसणाची पेस्ट, फक्त बनवताना टाळा 'या' चुका; पाहा सोप्या टिप्स

बरेच आठवडे फ्रेश राहील आलं-लसणाची पेस्ट, फक्त बनवताना टाळा 'या' चुका; पाहा सोप्या टिप्स

Kitchen Tips : अनेकांना ही तक्रार असते की, ही पेस्ट जास्त दिवस चांगली राहत नाही. फ्रेश राहत नाही. लवकर खराब होते. इतकंच नाही तर याचा गंधही जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:36 IST2025-08-04T14:34:40+5:302025-08-04T14:36:05+5:30

Kitchen Tips : अनेकांना ही तक्रार असते की, ही पेस्ट जास्त दिवस चांगली राहत नाही. फ्रेश राहत नाही. लवकर खराब होते. इतकंच नाही तर याचा गंधही जातो.

Tips and tricks to store ginger garlic paste fresh long time | बरेच आठवडे फ्रेश राहील आलं-लसणाची पेस्ट, फक्त बनवताना टाळा 'या' चुका; पाहा सोप्या टिप्स

बरेच आठवडे फ्रेश राहील आलं-लसणाची पेस्ट, फक्त बनवताना टाळा 'या' चुका; पाहा सोप्या टिप्स

Kitchen Tips : आलं आणि लसणाची पेस्ट भारतीय पदार्थांची टेस्ट दुप्पट करतात. ही पेस्ट जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये घातली जाते. पण या अनेकांना ही तक्रार असते की, ही पेस्ट जास्त दिवस चांगली राहत नाही. फ्रेश राहत नाही. लवकर खराब होते. इतकंच नाही तर याचा गंधही जातो. आणि वेळेवर पेस्ट करायची म्हटलं तर तेवढा वेळ नसतो. त्यामुळे हवे तसे पदार्थही बनवता येत नाही.

जर आपल्याला सुद्धा ही समस्या होत असेल आणि आल्या-लसणाची पेस्ट जास्त दिवस फ्रेश ठेवायची असेल काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. त्याच आज आपण पाहणार आहोत.

नॅचरल प्रीजर्व्हेटिव टाका

आलं-लसणाची पेस्ट तयार करण्यासाठी नेहमीच फ्रेश लसूण आणि आल्याचा वापर करा. हे एका स्वच्छ फूड प्रोसेसरमध्ये बारीक करा. यात चिमुटभर मीठ, १ चमचा तेल आणि १ चमचा व्हाइट व्हिनेगर टाका. या गोष्टींमुळे पेस्ट काळपट होणार नाही आणि त्यात बॅक्टेरियाही होणार नाहीत.

पाणी नका टाकू

आलं आणि लसूण ब्लेंड करताना त्यात कधीही पाणी टाकू नका. असं केल्यास पेस्ट लवकर बेकार होऊ शकते. जर पेस्ट फार घट्ट असेल तर त्यात पाण्याऐवजी थोडं तेल टाका. पाण्यात बॅक्टेरिया वाढतात, पण तेलामुळे पेस्ट मुलायम आणि फ्रेश राहते.

फ्रिजमध्ये ठेवा

पेस्ट एका स्वच्छ आणि एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करून फ्रिजमध्ये ठेवा. तसेच पेस्ट काढण्यासाठी नेहमीच स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करा. जर योग्य पद्धतीनं ठेवली तर पेस्ट २ ते ३ आठवडे टिकून राहते.

जास्त टिकण्यासाठी काय?

जर ही पेस्ट जास्त दिवसांसाठी फ्रेश ठेवायची असेल तर ती फ्रिज करून ठेवू शकता. पेस्ट आइसक्यूब ट्रेमध्ये टाकून फ्रिज करा. गोठल्यानंतर क्यूब्स जिपलॉक किंवा एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. 

काय काळजी घ्याल?

जर पेस्टमधून अजब वास येत असेल, टेस्ट वेगळी लागत असेल किंवा हिरवी झाली असेल तर ती फेकून द्या. ब्लेंड करताना व्हाइट व्हिनेगर टाकल्यानं रंग फिक्का होऊ शकतो. त्याशिवाय कंटेनरमध्ये कधीही ओला चमचा घालू नये.

Web Title: Tips and tricks to store ginger garlic paste fresh long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.