इडली, डोसा, उत्तपा हे पदार्थ जर नाश्त्यामध्ये असतील तर नाश्ता कसा छान होतो. अनेक घरांमध्ये तर इडली- सांबार, मसाला डोसा हे पदार्थ रात्रीच्या जेवणातही खाल्ले जातात. कारण ते पचायला खूप हलके असतात. शिवाय घरातले लहान मुलंही इडली, डोसा, उत्तपा पाहून खूश होतात. म्हणूनच इडलीचं पीठ घरीच तयार करण्याचा बेत आखला जातो. पण नेमकं हिवाळ्यात थंडीमुळे पीठ चांगलं आंबवलं जात नाही. त्यामुळे मग इडल्या हव्या तशा छान फुलून येत नाहीत आणि हलक्या होत नाहीत. म्हणूनच हिवाळ्यात इडलीचं पीठ आंबविताना या काही गोष्टी आवर्जून करून पाहा (how to ferment idli dosa batter in cold weather?). जेणेकरून पीठ चांगलं आंबवलं जाईल आणि पीठ तर छान फुगून येईलच पण इडल्याही अतिशय मऊसूत आणि हलक्या होतील..(tips and tricks for the well fermentation of idli batter in winter)
हिवाळ्यात इडलीचं पीठ लवकर आंबविण्यासाठी टिप्स
१. कुकर किंवा मायक्रोवेव्हचा वापर
हिवाळ्यात इडलीचं पीठ व्यवस्थित आंबवलं न जाण्याचं कारण म्हणजे त्याला हवी तशी उष्णता मिळत नाही. यासाठी तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. मायक्रोवेव्ह ५ ते ७ मिनिटांसाठी प्री हिटवर लावा आणि त्यानंतर ते बंद करून त्यामध्ये इडलीचं पीठ ठेवून द्या.
काळवंडलेली त्वचा चमकदार करणारा ऑरेंज फेसपॅक! संत्रीचे साल फेकून न देता 'असे' वापरून पाहा
त्याच्यातल्या उष्णतेमुळे पीठ लवकर आंबवलं जाईल. घरात जर मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही मोठ्या आकाराचं कुकर किंवा कढई वापरू शकता. कुकर किंवा कढई गॅसवर ५ ते ७ मिनिटांसाठी गरम करा. त्यानंतर त्यामध्ये इडलीच्या पिठाचं भांडं ठेवा आणि ते ताटलीने झाकून टाका. पीठ लवकर आंबवलं जाईल.
२. उन्हात ठेवा
हिवाळ्याच्या दिवसांत शक्यतो दिवसा पीठ आंबविण्यासाठी ठेवावं. कारण रात्री तापमान खूप कमी असतं. दिवसा तुमच्याघरात जिथे कुठे थोडं ऊन येत असेल तिथे इडलीचं पीठ ठेवा. थोडावेळ अंगणात, गच्चीवर, बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये ठेवलं तरी चालेल.
३. गरम पाणी
इडलीचं पीठ आंबविण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर दोन पद्धतीने करू शकता. एक म्हणजे डाळ- तांदूळ मिक्सरमधून बारीक करताना त्यात थंड पाण्याऐवजी गरम पाणी टाकावं.
Christmas 2024: केकची सगळ्यात सोपी रेसिपी, चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- घ्या रेसिपी
तसंच दुसरं म्हणजे एका मोठ्या भांड्यात थोडं गरम पाणी घ्या आणि त्या गरम पाण्यात इडलीच्या पीठाचं भांडं ठेवा. पाण्याच्या उष्णतेमुळे पीठ लवकर आंबवलं जाईल.