Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकवेळी चहा परफेक्ट टेस्टी का होत नाही? जास्त दूध किंवा पाणी नाही, टायमिंगचा असतो सगळा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:31 IST

Perfect Tea Making Tips : अनेकांना वाटतं की, जास्त दूध घालून किंवा महागडी पावडर वापरून चहा अधिक टेस्टी होतो. पण असं अजिबात काही नाहीये. कारण खरा खेळ हा पाणी किंवा दुधाचा नाहीच. टायमिंगचा सगळा खेळ असतो.

Perfect Tea Recipe: चहा अनेकांसाठी केवळ फ्रेश करणारं एक पेय नसून एक भावना आहे. अनेकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहाशिवाय होऊच शकत नाही. थकवा, सुस्ती घालवण्यासाठी एक कप कडक चहा मदत करतो. सामान्यपणे चहात दूध, चहा पावडर आणि साखर घातली जाते. कधी चहा टेस्टी लागतो, तर कधी फिक्का लागतो. अनेकांना वाटतं की, जास्त दूध घालून किंवा महागडी पावडर वापरून चहा अधिक टेस्टी होतो. पण असं अजिबात काही नाहीये. कारण खरा खेळ हा पाणी किंवा दुधाचा नाहीच. टायमिंगचा सगळा खेळ असतो. जर परफेक्ट चहा करायचा असेल तर टायमिंग महत्वाचं ठरतं. पाहुयात कसा कराल परफेक्ट टेस्टी चहा.

कधी घालावी चहा पावडर?

जास्तीत जास्त लोक असं करतात की, पातेल्यात पाणी टाकल्या टाकल्या त्यात वरून चहा पावडरही टाकतात. पण ही चुकीची पद्धत आहे. पाणी आधी चांगलं उकडू द्या, त्यानंतरच त्यात चहा पावडर घालावी. चहा पावडर घातल्यानंतर केवळ २ ते ३ मिनिटे उकडू द्या. जर जास्त वेळ चहा पावडर उकडाल तर चहा कडू लागू शकतो. कारण चहा पावडर आपलं टॅनिन सोडते.

​आलं आणि वेलची कधी टाकाल?

जर चहामध्ये आपण आल्याचे तुकटे कांडून थंड पाण्यात टाकत असाल तर आपल्याला त्याची चव अजिबात मिळणार नाही. आले आणि वेलची पाणी चांगलं गरम झाल्यावरच घाला. चहा पावडरसोबत साधारण १ मिनिटे शिजू द्या. तेव्हा त्यांची चव पाण्यात चांगली मिक्स होईल.

दूध आणि पाणी 

जास्त दुधाचा चहा जड वाटतो आणि जास्त पाणी असेल तर पानचट लागतो. अशात योग्य प्रमाण महत्वाचं ठरतं. एक कप चहासाठी नेहमीच 1/3 कप पाणी आणि 2/3 कप दूध घालावं. दूध नेहमी रूम टेम्प्रेचरवर किंवा हलकं गरम असावं. फ्रिजमधून काढलेलं थंड दूध चहात घालात तर टेस्ट बिघडू शकते. 

साखर कधी टाकाल?

जास्तीत जास्त लोक सुरूवातीलाच पाण्यात साखर घालतात. पण एक्सपर्ट सांगतात की, साखर कधीही दूध टाकल्यानंतरच घालावी. साखर लवकर विरघळते, त्यामुळे खूप आधीच टाकण्यात अर्थ नाही.

झाकून ठेवा

बरेच लोक चहा झाल्यानंतर लगेच कपात गाळून घेतात. पण ही चुकीची पद्धत आहे. गॅस बंद केल्यानंतर चहाचं भांडं काही सेकंदासाठी झाकून ठेवा. याला 'दम' देणं म्हणतात. असं केल्याने चहाचा सुगंध अधिक चांगला येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Perfect tea every time: Timing is key, not just ingredients.

Web Summary : Perfect tea needs timing. Add tea powder after boiling water for 2-3 minutes. Add ginger and cardamom with tea powder. Use 1/3 cup water and 2/3 cup milk. Add sugar after milk and cover after brewing.
टॅग्स :अन्नकिचन टिप्स