Lokmat Sakhi >Food > भाग्यश्रीने सांगितलं फक्त ३ पदार्थ वापरून कशी करायची तिळाची चवदार वडी- बघा इंस्टंट रेसिपी 

भाग्यश्रीने सांगितलं फक्त ३ पदार्थ वापरून कशी करायची तिळाची चवदार वडी- बघा इंस्टंट रेसिपी 

Makar Sankranti Special Til Gul Vadi Recipe By Actress Bhagyashree: संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने तिळगुळाची वडी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही एक सोपी रेसिपी पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 16:23 IST2025-01-15T16:22:32+5:302025-01-15T16:23:44+5:30

Makar Sankranti Special Til Gul Vadi Recipe By Actress Bhagyashree: संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने तिळगुळाची वडी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही एक सोपी रेसिपी पाहा..

til gul instant vadi recipe, how to make til gul chikki, actress bhagyashree shared til gul chikki recipe  | भाग्यश्रीने सांगितलं फक्त ३ पदार्थ वापरून कशी करायची तिळाची चवदार वडी- बघा इंस्टंट रेसिपी 

भाग्यश्रीने सांगितलं फक्त ३ पदार्थ वापरून कशी करायची तिळाची चवदार वडी- बघा इंस्टंट रेसिपी 

Highlightsशक्य असेल तर ही रेसिपी करण्यासाठी लोखंडी कढई वापरावी. कारण लोखंडी कढईमध्ये केलेला पदार्थ जास्त पौष्टिक असतो.

अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. त्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अनेकदा फिटनेस टिप्स, डाएट टिप्स देते. कधी एखादा व्यायाम करून दाखवते आणि त्याचं महत्त्व समजावून सांगते तर कधी एखादी पौष्टिक रेसिपी शेअर करते. आतासुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाग्यश्रीने एक छोटासा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यामध्ये चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच या दिवसांत भरपूर प्रमाणात खाल्ली जाणारी आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असणारी तिळगुळाची वडी कशी तयार करायची, याची रेसिपीसुद्धा शेअर केली आहे (Makar Sankranti Special Til Gul Vadi Recipe By Actress Bhagyashree). तिळगुळाची इंस्टंट वडी कशी करावी हा प्रश्न पडला असेल तर भाग्यश्रीचा हा व्हिडिओ एकदा बघाच..(actress Bhagyashree shared til gul chikki recipe)

तिळगुळाची वडी करण्याची भाग्यश्रीची खास रेसिपी

 

साहित्य

५ ते ६ टेबलस्पून तीळ

१ टेबलस्पून तूप

'घर का खाना' आणि 'या' खास पदार्थामुळे कतरिना कैफ आहे एवढी फिट, तिच्यासारखी फिगर हवी तर..

३ ते ४ टेबलस्पून गूळ

कृती

सगळ्यात आधी तर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तीळ टाकून थोडेसे भाजून घ्या. तीळ भाजताना ते नेहमी मंद ते मध्यम आचेवर भाजावे. त्यामुळे ते जळत नाहीत आणि अगदी खमंग भाजले जातात.

शक्य असेल तर ही रेसिपी करण्यासाठी लोखंडी कढई वापरावी. कारण लोखंडी कढईमध्ये केलेला पदार्थ जास्त पौष्टिक असतो.

 

तीळ भाजून घेतल्यानंतर ते कढईतून काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये तूप घाला. 

तूप गरम झाल्यानंतर त्यात गूळ घाला. गूळ व्यवस्थित विरघळला आणि तुपामध्ये चांगला एकजीव झाला की मग त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालावेत. 

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करू शकता जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ, सुंदर दिसाल..

तीळ, गूळ आणि तूप छान एकजीव होईपर्यंत हलवावे. हळूहळू ते थोडे घट्ट होते. मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करा.

आता पोळपाटाला आणि लाटण्याला थोडे तूप लावून घ्या. त्यावर कढईमध्ये तयार झालेले तिळगुळाचे गरम मिश्रण ठेवा आणि लाटण्याने लाटून ते पसरवून घ्या. 

मिश्रण गरम असतानाच सुरीने कापून तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या तयार करून घ्या. तिळगुळाची चवदार, पौष्टिक वडी झाली तयार..


 

Web Title: til gul instant vadi recipe, how to make til gul chikki, actress bhagyashree shared til gul chikki recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.