लवकरच शाळेची घंटा वाजेल आणि पुन्हा टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न पालकांना सतावेल.(Aloo Palak Paratha recipe) मुलं लहान असो किंवा मोठं टिफिन बॉक्समध्ये आज काय? हा प्रश्न त्यांना सारखा पडतो.(Tiffin box recipe for kids) खाऊच्या डब्यात काय द्यायला हवं, मुलांच्या आवडीचा पदार्थ नसला तर असे एक नी अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. (Potato spinach paratha for kids)
घाईच्या वेळी आपण मुलांना ब्रेड-बटर, ब्रेड-जाम , सॅण्डविचसारखे पदार्थ खाऊ घालतो.(Healthy paratha recipe for lunchbox) पण त्यामुळे मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जात नाही. सतत मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटाचे विकार ही जडतात. भाज्यांची नावे काढली की मुलांचे तोंड वाकडे होते.(Aloo palak paratha at home) त्यातल्या त्यात बटाटा हा मुलांसह घरातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. त्यात दोघेजण शाळेत जाणारे असतील तर प्रत्येकाची निवड वेगळी. एकाला बटाटा तर दुसऱ्या पालक आवडत असेल तर आपल्याला सतत जेवण बनवूनही कंटाळा येतो. पण अशावेळी दोन पदार्थांतून आपण एकच पौष्टिक पदार्थ हमखास बनवू शकतो. पालक आणि बटाट्याचा पराठा आपण बनवू शकतो, पाहूया रेसिपी (How to make aloo palak paratha for tiffin)
गावरान पद्धतीचं खारं वांगं, झणझणीत-पारंपरिक रेसिपी, टम्म फुगलेल्या भाकरी-भातासोबत चव चाखा..
साहित्य
गव्हाचे पीठ - २ वाटी
बेसन - १ वाटी
गरम मसाला - १ चमचा
धने-जिरे पावडर - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
ओवा - चमचाभर
आल्याचा तुकडा - १ इंच
लसूण पाकळ्या - ६ ते ७
हिरव्या मिरच्या - ६ ते ७
पुदिन्याची पाने
बारीक चिरलेला पालक - १ वाटी
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
उकडलेला बटाट - १
तूप - १ चमचा
तीळ
कृती
1. सगळ्यात आधी एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन आणि मसाले घाला.
2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आले-लसूण, हिरव्या मिरच्या आणि पुदिना घालून त्याचे वाटण तयार करा.
3. हे वाटण पीठाच्या मिश्रणात घाला. त्यात ओवा आणि तीळ घालून मिक्स करा.
4. आता पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यात कांदा आणि उकडून मॅश केलेला बटाटा पिठाच्या मिश्रणात घाला.
5. वरुन चमचाभर तूप घालून मिश्रणाचे पीठ मळून घ्या. पिठाचे गोळे करुन पराठा लाटा.
6. मंद आचेवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून वरुन तूप लावा. तयार होतील मऊ लुसलुशीत बटाटा पालक पराठा.