lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ग्लुकोज बिस्किटचे पेढे? बघा १० रुपयांत भन्नाट पेढ्याचा प्रकार, झटपट आणि मस्त

ग्लुकोज बिस्किटचे पेढे? बघा १० रुपयांत भन्नाट पेढ्याचा प्रकार, झटपट आणि मस्त

This Raksha Bandhan make Glucose biscuit Pedha in 10 Rs विकतचे कशाला, घरच्या - घरी ग्लुकोज बिस्किटांचा तयार करा, गोड - मऊ पेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 10:51 AM2023-08-28T10:51:38+5:302023-08-28T10:52:28+5:30

This Raksha Bandhan make Glucose biscuit Pedha in 10 Rs विकतचे कशाला, घरच्या - घरी ग्लुकोज बिस्किटांचा तयार करा, गोड - मऊ पेढा

This Raksha Bandhan make Glucose biscuit Pedha in 10 Rs | ग्लुकोज बिस्किटचे पेढे? बघा १० रुपयांत भन्नाट पेढ्याचा प्रकार, झटपट आणि मस्त

ग्लुकोज बिस्किटचे पेढे? बघा १० रुपयांत भन्नाट पेढ्याचा प्रकार, झटपट आणि मस्त

श्रावण सुरु झालं की सणासुदीला देखील सुरुवात होते. या दिवसात खवय्यावर्गाची चंगळ सुरु असते. पुरणपोळी, पुरी श्रीखंडसोबत, गोड पदार्थ म्हणून खीर, पेढे, बर्फी, जलेबी, गुलाब जाम हे पदार्थ आवडीने केले जातात. आता काही दिवसात रक्षा बंधन हा सण येईल. या गोड नात्याच्या सणानिमित्त काहीतरी हटके ट्राय करायचं असेल तर, घरी ग्लुकोज बिस्किटांचा पेढा तयार करून पाहा. ओवाळणीदरम्यान, बहिण भावाला काहीतरी गोड पदार्थ भरवते.

गोड पदार्थ म्हणून आपण त्यांच्यासाठी खास ग्लुकोज बिस्किटांचा पेढा तयार करू शकता. बाजारातून विकतचे पेढे आणण्यापेक्षा, उत्कृष्ट चवीचा हा पेढा अवघ्या १० मिनिटात तयार होतो. गॅसचा वापर न करता, जास्त मेहनत न घेता हा पेढा कसा तयार करायचा पाहूयात(This Raksha Bandhan make Glucose biscuit Pedha in 10 Rs).

ग्लुकोज बिस्किटांचा पेढा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

ग्लुकोज बिस्किटे

साखर

डेसिकेटेड कोकोनट

मिल्क पावडर

पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

सुका मेवा

दूध

पिस्ता

कृती

सर्वप्रथम, १० रुपयांचा ग्लुकोज बिस्किटांचा पॅकेट फोडा. मिक्सरचं भांडं घ्या, त्यात हाताने मोडून बिस्किटे मिक्सरच्या भांड्यात ठेवा. त्यात २ चमचे साखर घाला, हवं असल्यास आपण त्यात साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता. त्यानंतर मिक्सरचं झाकण लावून बिस्किटांचा चुरा तयार करा. तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून ठेवा. त्यात एक कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप बारीक चिरलेला सुका मेवा, व गरजेनुसार दूध घालून साहित्य एकजीव करा. मिक्स करताना जास्त दूध घालू नये, पेढे तयार करण्यासाठी त्यात घट्टपणा असावा.

ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

हाताला थोडे तूप लावा. व तयार पिठाचा गोळा हातात घेऊन त्याला गोलाकार द्या. सजवण्यासाठी आपण पेढ्यांवर पिस्ता किंवा सुका मेवा लावू शकता. त्यानंतर पेढे सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये २ तासांसाठी ठेवा. अशा प्रकारे जास्त मेहनत न घेता, गॅसचा वापर न करता, ग्लुकोज बिस्किटांचे पेढे खाण्यासाठी रेडी.

Web Title: This Raksha Bandhan make Glucose biscuit Pedha in 10 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.