Onion Chutney : शरीरात बॅड कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) वाढणं ही गंभीर समस्या आजकाल अनेकांना शिकार बनवत आहे. याचा कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल. कोलेस्टेरॉल हा एक चिकट पदार्थ असतो, जो नसांमध्ये चिकटून बसतो आणि ब्लड सर्कुलेशनमध्ये अडथळा निर्माण करतो. अशात हार्ट अटॅकचा धोका वाढतो. वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहे. यात काही घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरतात. असाच एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तो म्हणजे कांद्याची एक खास चटणी. चला तर जाणून घेऊ ही चटणी कशी फायदेशीर ठरते आणि कशी तयार कराल.
कोलेस्टेरॉल कमी करणारी कांद्याची चटणी
कांद्याच्या या खास आणि टेस्टी चटणीमध्ये डायटरी फायबर भरपूर असल्यानं शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास खूप मदत मिळते. फायबरमुळे बॅड कोलेस्टेरॉल शोषलं जातं आणि नसांची आतून सफाई होते.
कशी बनवला ही चटणी?
२ ते ३ कांदे कापून घ्या. त्यात एका बिटाचे काही तुकडे टाका आणि ३ ते ४ हिरव्या मिरच्या घ्या. त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि जिरे पावडर मिक्स करा. थोडं काळं मीठ आणि एका लिंबाचा रस टाका. आता या सगळ्यात गोष्टी मिक्सरमधून बारीक करा. ही चटणी एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करून फ्रिजमध्ये ठेवा. रोज जेवताना ही चटणी खाऊ शकता.
डायजेशन चांगलं होईल
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ते पचन तंत्र मजबूत करण्यास मदत करतं. पचनक्रिया जर सुधारली तर पोटासंबंधी अनेक समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेची समस्या लगेच दूर होते.
शरीर आतून होईल साफ
कांद्याची ही खास चटणी खाल तर बॉडी डिटॉक्स करण्यासही मदत मिळते. कांद्यातील सल्फर तत्व शरीरात जमा विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. ज्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.
इम्यूनिटीही वाढते
कांद्याच्या या चटणीमध्ये अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळतं. हे दोन्ही तत्व शरीराची इम्यूनिटी वाढवतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.