Join us

साबुदाण्याचे फ्राईज म्हणा किंवा कुरकुरे चवीला हा पदार्थ लय भारी!! उपासासाठी खास खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 13:23 IST

this dish is delicious!! Eat it especially for fasting, sago fries recipe : उपासासाठी खास खाऊ. कुरकुरीत साबुदाण्याचे फ्राईज. नक्की करा.

उपवासाच्या आदल्या दिवशी घरोघरी साबुदाणा भिजत घातला जातो. साबुदाणा वडे तसेच खिचडी हे पदार्थ उपासासाठी फार लोकप्रिय आहेत. ( this dish is delicious!! Eat it especially for fasting, sago fries recipe )साबुदाण्याचे थालीपीठही केले जाते. त्याची चवही अगदी सुंदर असते. साबुदाण्याला इतरही पर्याय आहेत, जे उपासाला करता येतात. मात्र उपासाच्या दिवशी साबुदाणाच राजा असतो. असे ही काही आहेत जे साबुदाणा खिचडी  खायला मिळावी म्हणून उपवास ठेवतात. पण साबुदाणा फक्त उपासालाच खावा असा काही नियम नाही. इतरही दिवशी खाता येतोच. 

गोड काही खावेसे वाटले तर साबुदाण्याची खीरही अगदी उत्तम पर्याय आहे. ( this dish is delicious!! Eat it especially for fasting, sago fries recipe )तसेच चहासोबत खाण्यासाठी किंवा लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी साबुदाण्याचे फ्राईज करता येतात. चवीला अगदी छान असतात. मस्त कुरकुरीत असतात. करायला अगदीच सोपे आहेत पाहा ही रेसिपी. 

साहित्यसाबुदाणा, बटाटा, हिरवी मिरची, दाण्याचे कुट, जिरे पूड, मीठ

कृती१. साबुदाणा रात्रभर भिजवायचा. वाटीभर साबुदाणा घेतला तर दोन बटाटे घ्यायचे. बटाटे उकडून घ्यायचे. भिजवलेला साबुदाणा तसेच उकडलेले बटाटे एका खोलगट भांड्यात घ्यायचे. त्यात चमचाभर मीठ घालायचे. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे आणि ते तुकडे वाटू त्याची पेस्ट करायची. ती पेस्ट साबुदाणा व बटाट्याच्या मिश्रणात घालायची. 

३. मिश्रणात थोडे दाण्याचे कुट घालायचे. जिरे पूड घालायची. सगळं छान एकजीव करुन घ्यायचे. बटाटा कुसकरायचा त्यात तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. साबुदाणाही जरा मऊ होऊन एकजीव होतो. सगळे पदार्थ छान एकजीव झाल्यावर त्यात चमचाभर कडक तापलेले तेल घालायचे. पाच मिनिटे मिश्रण झाकून ठेवायचे आणि मग गॅस वर तेल तापत ठेवायचे. तेल छान तापल्यावर गॅस अगदी कमी ठेवायचा आणि हाताने साबुदाण्याच्या मिश्रणाला लांब-लांब  नळ्यांचा आकार देऊन तळणीत सोडायचे. 

४. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. मग काढून घ्यायचे. तेल निथळू द्या. जाळीवर तयार फ्राईज काढून घ्यायचे. त्यात कोथिंबीर घातली तरी छान लागते. आल्याचा तुकडा वाटणात घालू शकता. उपासासाठी करत असाल तर तुम्ही जे पदार्थ खाता तेवढेच घ्या.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.