Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चुकीच्या पद्धतीने खाताय हे ७ पदार्थ - पोषण मिळण्याऐवजी होईल अपचन, पाहा कुठे आणि काय चुकते

चुकीच्या पद्धतीने खाताय हे ७ पदार्थ - पोषण मिळण्याऐवजी होईल अपचन, पाहा कुठे आणि काय चुकते

These 7 foods are eaten incorrectly - instead of getting nutrition, you will get indigestion, see where and what goes wrong : हे पदार्थ खाताना होते चूक. पाहा काय कसे खावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 16:41 IST2025-09-19T16:40:34+5:302025-09-19T16:41:38+5:30

These 7 foods are eaten incorrectly - instead of getting nutrition, you will get indigestion, see where and what goes wrong : हे पदार्थ खाताना होते चूक. पाहा काय कसे खावे.

These 7 foods are eaten incorrectly - instead of getting nutrition, you will get indigestion, see where and what goes wrong | चुकीच्या पद्धतीने खाताय हे ७ पदार्थ - पोषण मिळण्याऐवजी होईल अपचन, पाहा कुठे आणि काय चुकते

चुकीच्या पद्धतीने खाताय हे ७ पदार्थ - पोषण मिळण्याऐवजी होईल अपचन, पाहा कुठे आणि काय चुकते

असे काही पदार्थ असतात जे आपण रोजच आहारात वापरतो. रोज नाही तरी वारंवार वापरले जातात. कारण ते पदार्थ सगळ्यांच्या आवडीचेही असतात आणि त्यात फार पोषणही असते. आरोग्यासाठी ते पदार्थ फार चांगले असतात. (These 7 foods are eaten incorrectly - instead of getting nutrition, you will get indigestion, see where and what goes wrong)त्यात अनेक पोषण आहे हे जाणून आपण ते आहारात घेतो. कायम खातो आणि आपल्याला असे वाटते की त्यातील पोषण आपल्याला मिळाले आहे. मात्र काही वेळा पदार्थ खाण्याची पद्धतही त्याच्या पोषणावर प्रभाव पाडते. म्हणजे फार पौष्टिक असे ओट्स जर भरपूर बटरमध्ये परतून खाल्ले तर त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही. तसेच काही पदार्थ असतात जे आपण कसे शिजवतो किंवा कशासोबत खातो यावरुन त्याची गुणवत्ता ठरते. असे काही पदार्थ खाताना तुम्हीही चूक करत असाल तर टाळा.  

१. टोमॅटो - टोमॅटोमध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. टोमॅटो सॅलेडमध्ये घालून त्यातील पोषण मिळते असे आपल्याला वाटते. मात्र टोमॅटोतील सत्व मिळवण्यासाठी टोमॅटो शिजवून नुसताच खाणे गरजेचे आहे. तरच त्याचा फायदा होतो.

२. कडधान्ये, मिलेट्स - असे पदार्थ खाताना त्यात तूप घालायचे. तुपामुळे त्याचे पोषण वाढते आणि चवही छान लागते. तसेच कडधान्ये कधीकधी बाधतात, मात्र तूप घातल्यावर बाधणारही नाहीत. 

३. चिया सिड्स - या बिया कायम किमान तासभर भिजवायच्या आणि मगच वापरायच्या. त्यामुळे पचनासाठी फायदा होतो आणि चवही छान लागते. 

४. कांदा, लसूण - कांदा लसूण सारखे पदार्थ चिरल्या चिरल्या कधीही शिजवायचे नाहीत. थोडावेळ बाजूला ठेवायचे ममग वापरायचे. त्यातील जीवनसत्वे जास्त प्रभावी होतात. 

५. बीट - काही जणांसाठी कच्चे बीट पचवणे कठीण जाऊ शकते. सगळ्यांनाच असा त्रास होणार नाही. मात्र काही जणांना होऊ शकतो. त्यामुळे बीट शिजवून किंवा वाफवून मग खायचे. 

६. शेंगदाणे - शेंगदाण्याची सालं काढून मग शेंगदाणे आपण खातो. मात्र शेंगदाण्याच्या सालात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे दाणे सालांसकट खाणे फायद्याचे ठरते. 

७. मोड आलेली कडधान्ये - मोड आलेली कडधान्ये फार पौष्टिक असतात. मात्र ती कच्ची खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पचायला जरा कठीण असतात. त्यामुळे जरा परतून, शिजवून किंवा वाफवून नंतरच खाणे योग्य ठरेल.   

Web Title: These 7 foods are eaten incorrectly - instead of getting nutrition, you will get indigestion, see where and what goes wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.