Join us

महिलांनी खायलाच हव्यात ‘या’ ५ गोष्टी, भरपूर ताकद देणारे सुपरफूड-कायम दिसाल तरुण आणि फिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:06 IST

Super Foods For Women :जर महिलांनी काही सुपरफूड्सचा रोजच्या आहारात समावेश केला तर त्यांची तब्येत ठणठणीत राहण्यास त्यांना मदत मिळू शकते. अशाच काही सुपरफूड्सबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Women's Health : कामाचा वाढता ताण, वाढलेल्या जबाबदाऱ्या, वाढलेली स्पर्धा, बदललेली लाइफस्टाईल यामुळे लोकांकडे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळच नाही. खासकरून महिलांना घर आणि काम अशी दुहेरी कसरत करावी लागते. त्यामुळे त्यांची तब्येत नेहमीच बिघडत असते. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ना खाण्या-पिण्यावर लक्ष असतं, ना व्यायाम किंवा पुरेशी झोप घेण्यावर. अशात जर महिलांनी काही सुपरफूड्सचा रोजच्या आहारात समावेश केला तर त्यांची तब्येत ठणठणीत राहण्यास त्यांना मदत मिळू शकते. अशाच काही सुपरफूड्सबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

महिलांसाठी सुपरफूड्स

बेरीज

तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी आणि अनेक पोषक तत्व मिळवण्यासाठी महिलांनी नियमितपणे आहारात बेरीजचा समावेश केला पाहिजे. सीझननुसार तुम्ही कोणत्याही बेरीज खाऊ शकता. जर बेरीजचा सीझन नसेल तर तुम्ही ड्राय बेरीजही खाऊ शकता. तुम्ही आहारात स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी खाऊ शकता. बेरीजमध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. बेरीज खाल्ल्यानं ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. बेरीजमध्ये व्हिटामिन सी आणि फोलिक अॅसिडही आढळतं. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतं.

दही

पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दही सगळ्यात बेस्ट मानलं जातं. महिलांनी रोज एक वाटी दही खायला हवं. रोज दही खाल्ल्यानं पोटात गुड बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर राहात. तसेच दही खाल्ल्यानं अल्सर आणि व्हजायनल इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. दह्यात कॅल्शिअम आणि व्हिटामिन बी 12 सारखे पोषक तत्व असतात.

टोमॅटो

टोमॅटो महिलांसाठी एक सुपरफूड ठरतं. महिलांनी रोज किमान एक टोमॅटो खायला हवा. यात लायकोपिन नावाचं तत्व असतं. तसेच यात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे त्वचा तरूण, ग्लोईंग आणि चमकदार करतात. तसेच टोमॅटो खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.

अ‍ॅवोकाडो

अ‍ॅवोकाडो सुद्धा एक सुपरफूड आहे. महिलांसाठी हे फळ खूप फायदेशीर मानलं जातं. या अनेक व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतं. महिलांनी आठवड्यातून किमान 2 ते 3 अ‍ॅवोकाडो फळ खाल्लं पाहिजे. यात मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि फोलिक अ‍ॅसिड असतं. ज्यामुळे शरीरात आलेली सूज, हृदयरोग, डायबिटीस, मेटाबॉलिक सिंड्रोम दूर केला जाऊ शकतो.

ऑरेंज ज्यूस आणि दूध

महिलांनी रोज किमान एक ग्लास दूध प्यायला हवं. यात कॅल्शिअम आणि व्हिटामिन सी असतं. दूध प्यायचं नसेल तर तुम्ही रोज एक ग्लास ऑरेंज ज्यूस प्यायला हवा. यानं वाढतं वय कमी करण्यास आणि कॅल्शिअ व व्हिटामिन डी मिळण्यास मदत मिळते. यानं महिलांची हाडं आणखी मजबूत होतात.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य