Lokmat Sakhi >Food > हे ४ पदार्थ आहेत फारच पौष्टिक.. किचनमध्ये नक्की असतील पण आहारात घेता का?

हे ४ पदार्थ आहेत फारच पौष्टिक.. किचनमध्ये नक्की असतील पण आहारात घेता का?

These 4 foods are very healthy, but do you include 'them' in your diet? : आहारामध्ये असायला हवे हे पदार्थ. शरीरासाठी फायदेशीर असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2025 14:33 IST2025-04-20T14:30:45+5:302025-04-20T14:33:54+5:30

These 4 foods are very healthy, but do you include 'them' in your diet? : आहारामध्ये असायला हवे हे पदार्थ. शरीरासाठी फायदेशीर असतात.

These 4 foods are very healthy, but do you include 'them' in your diet? | हे ४ पदार्थ आहेत फारच पौष्टिक.. किचनमध्ये नक्की असतील पण आहारात घेता का?

हे ४ पदार्थ आहेत फारच पौष्टिक.. किचनमध्ये नक्की असतील पण आहारात घेता का?

भारतील खाद्यसंस्कृतीमधील अन्नपदार्थ अगदी पौष्टिक आहेत. तसेच भारतातील हवामानाला साजेसे अन्न आपल्या आहारात असणे गरजेचे असते. (These 4 foods are very healthy,  but do you include 'them' in your diet?)त्यानुसार हे पदार्थ वर्षानुवर्षे लोक खात आले आहेत. मात्र आजकाल विदेशी भाज्या, फळे आणि इतरही काही पदार्थांना भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पौष्टिक आहार म्हणजे त्यामध्ये असे महागडे अन्न असायला हवे असे लोकांना वाटते. चांगले पदार्थ खायलाच हवेत. पण आदर्श भारतीय आहारातील पदार्थांएवढे पौष्टिक आपल्यासाठी काहीच ठरणार नाही. (These 4 foods are very healthy,  but do you include 'them' in your diet?)आपल्या स्वयंपाकघरात काही अन्न पदार्थ असतात जे आपण अगदी क्वचित कधी तरी खातो. मात्र या पदार्थांचा आहारात समावेश करुन घेणे फार फायद्याचे ठरेल. पाहा कोणते पदार्थ आहेत. 

१. सातूचे पीठ
लहानपणी आई दुधात किंवा ताकात सातूचे पीठ घालून द्यायची. चवीला ते छान लागायचे. हे सातूचे पीठ अत्यंत पौष्टिक असते. आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. तसेच फायबरही असते. जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असते. खनिजांनी समृद्ध असते. सातूचे पीठ खाल्ल्याने पचन सुधारते. वजन कमी होते. उष्णतेवर तर हे पीठ औषधच आहे. मधुमेह , रक्तदाबाचे त्रास कमी होतील. सातूचे सरबत प्या. लाडू करा. पेज करा. आहारामध्ये सातू असायला हवे.
 
२. खजूर
महिलांसाठी खजूर खाणे फार चांगले आहे. रोज एक खजूर खायला काहीच हरकत नाही. पाळी वेळेवर येत नाही ही अनेकांची तक्रार असते. खजूर शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. त्याचा शरीराला त्रास होत नाही. पाळी वेळेवर येण्यासाठी ही उष्णता फायद्याची ठरते. शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम खजूर करतो. खजूरामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 

३. लिंबू
लिंबू पाणी रोज पिणे फार फायद्याचे ठरते. त्वचेसाठी लिंबू चांगले असते. मात्र त्वचेला रस लावण्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. लिंबाचा रस पिण्याचे काहीच तोटे नाहीत. लिंबू पाणी उन्हाळ्यामध्ये तर रोज प्यायला हवे. लिंबू हा जीवनसत्त्व 'सी'चा एक उत्तम स्त्रोत आहे.   

४.ज्वारी-बाजरी-नाचणी
ज्वारी, नाचणी सारखी पिठे घरामध्ये असतात. त्यांचा वापर आपण फार कमी करतो. खरे तर हे पदार्थ रोजच्या आहाराचा भाग असले पाहिजेत. आजही अनेक गावांमधून आहारामध्ये भाकरीचा समावेश असतो. भाकरी अत्यंत पौष्टिक असते. भाकरीमुळे वजनही वाढत नाही. त्यामुळे विविध पि‍ठांच्या भाकऱ्या खाणे शरीरासाठी फायद्याचे आहे. 
 

Web Title: These 4 foods are very healthy, but do you include 'them' in your diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.