Join us

केळी खाण्याची योग्य वेळ महत्वाची, लगेच दूर होतील आरोग्यासंबंधी अनेक समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 14:37 IST

Banana Eating Benefits : केळी योग्य पद्धतीने खाल्ले तर शरीराला अधिक फायदे मिळतात. प्रत्येक गोष्ट खाण्याची एक योग्य वेळ असते. ती केळी खातानाही पाळली गेली पाहिजे.

Banana Eating Benefits : केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. केळीचं सेवन केल्याने पोट भरलं राहतं. सोबतच आरोग्यालाही इतर अनेक फायदे मिळतात. पण केळी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर आरोग्याचं नुकसानही होतं. आयुर्वेदात केळी खाण्याची योग्य पद्धत सांगण्यात आली आहे. केळी योग्य पद्धतीने खाल्ली तर शरीराला अधिक फायदे मिळतात. प्रत्येक गोष्ट खाण्याची एक योग्य वेळ असते. ती केळी खातानाही पाळली गेली पाहिजे.

केळी खाण्याची योग्य वेळ

आयुर्वेद एक्सपर्ट्सनुसार, सामान्यपणे सगळी फळं जेवण करण्याआधी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण केळी हे एक असं एकुलतं एक फळ आहे जे जेवण केल्यावरही खाऊ शकता. जेवण केल्यावर केळी खाण्याचे अनेक फायदे असतात. याने अ‍ॅसिडिटीसारखी समस्या लगेच दूर होते. केळी खाल्ल्याने पित्तही कमी होतं. तसेच रक्तही शुद्ध होतं. इतकंच नाही तर केळी खाल्ल्याने शरीरातील टॉक्सीन बाहेर निघतात. 

चरक संहितेमध्ये सांगण्यात आलं आहे की, केळी खाताना किंवा नंतर काही वेळासाठी काही चुका करू नये. याने शरीराला नुकसान पोहोचू शकतं. ही माहिती मलेशियाचे मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. चला जाणून घेऊ याबाबत...

1 तास पिऊ नका पाणी

आयुर्वेदात कोणतंही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यास मनाई केली आहे. हा नियम केळी खाण्यावर लागू पडतो. हे फळं पचनाला जड असतं आणि पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. केळी खाल्ल्यावर 1 तासाच्या अंतराने तुम्ही पाणी पिऊ शकता. 

केळी खाण्याचे फायदे

पोषक तत्वे

जर तुम्ही 115 ग्रॅम केळींच सेवन केलं तर त्यातून तुम्हाला इतके पोषक तत्वे मिळतात की, तुम्ही हैराण व्हाल. केळीमध्ये 110 कॅलरी, 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 1 ग्रॅम प्रोटीन, 0.3 मिलीग्रॅम मॅग्नीज, 450 मिलीग्रॅम पोटॅशियम, 34 मिलीग्रॅम मॅग्नेशियम, 0.3 मिलीग्रॅम आयर्न, 0.1 मिलीग्रॅम रायबोफ्लेविन, 0.8 मिलीग्रॅम नियासिन, 81 इंटरनॅशनल यूनिट व्हिटामिन ए, 0.5 मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी-6, 9 मिलीग्रॅम व्हिटामिन सी, 3 ग्रॅम डाइट्री फायबर, 25 मायक्रोग्रॅम फॉलेट यासोबतच केळींची खासियत म्हणजे यात फॅट, कोलेस्टेरॉल आणि सोडियम अजिबात नसतं. तर पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं. एका व्यक्तीला एका दिवसात ४७०० मिलीग्रॅम पोटॅशिअमची गरज असते. 

केळी खाल्याने हृदयरोग दूर राहतात

केळी हृदय रोगाने ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात. नियमीत रुपाने केळी खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. या कारणाने केळी खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. तसेच यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्या कारणाने रक्तात हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज दोन केळी खाणाऱ्यांना हृदय रोग आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होत नाही.

केळी खाल्याने डोकं शांत राहतं

तणाव किंवा डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्याने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. कारण केळींमध्ये प्रोटीन आणि अनेक अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोक शांत करतात. 

ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल

केळीचं सेवन नियमीतपणे केल्याने ब्लड प्रेशर सामान्य राहतं. यात पोटॅशिअम आढळतं जे ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी करतात. तसेच याने हायपरटेंशनची समस्याही नियंत्रित राहते.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स