Join us

अर्धवट चिरलेले, उरलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेवावं का? तज्ज्ञ सांगतात, कलिंगड खाण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 12:15 IST

Is It Safe To Keep Cut Watermelon In Fridge Expert Tells : How safe is it to eat a half-cut and wrapped watermelon : The Only Way To Store Cut Watermelon, According to an Expert : The Best Way to Store Cut Watermelon : कलिंगड कापून ते फ्रिजमध्ये ठेवावे की ठेवू नये, अर्धवट कापलेलं कलिंगड स्टोअर करताना लक्षात ठेवा...

उन्हाळ्यात बहुतेक सगळ्यांनाचं लालचुटुक रसाळ कलिंगड खायला आवडत. उन्हाळा संपेपर्यंत घरोघरी अनेकदा कलिंगड विकत आणलं जात. लालेलाल आणि रसदार कलिंगडामध्ये ९० % पाण्यासोबतच (Is It Safe To Keep Cut Watermelon In Fridge Expert Tells) अनेक आवश्यक पोषक तत्व देखील असतात. कलिंगड (How safe is it to eat a half-cut and wrapped watermelon) खाल्ल्याने शरीर आतून थंड तर राहतंच, सोबतच डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो(The Only Way To Store Cut Watermelon, According to an Expert).

आपण अनेकदा बाजारांतून कलिंगड विकत आणताना आकाराने भलं - मोठं कलिंगड विकत आणतो. परंतु काहीवेळा एवढं भलं - मोठं कलिंगड कापून ते एकाचवेळी खाऊन संपत नाही, अशावेळी आपण हे अर्धवट कापलेलं कलिंगड खराब होऊ नये म्हणून थेट फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु कलिंगड असे अर्धवट कापून फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. आपल्यापैकी बऱ्याचजणांना कलिंगड कापून ते फ्रिजमध्ये ठेवून थंडगार झाल्यावर खायला आवडत. परंतु कलिंगड कापून ते फ्रिजमध्ये ठेवावे की ठेवू नये, याबद्दल दिल्लीतील आहारतज्ज्ञ प्राची छाब्रा यांनी ओन्ली माय हेल्थला दिलेल्या मुलाखतीत अधिक माहिती दिली आहे(The Best Way to Store Cut Watermelon).

 कलिंगड अर्धवट कापून फ्रिजमध्ये ठेवणे योग्य की आयोग्य ?      

तज्ज्ञांच्या मते, अर्धवट कापलेले कलिंगड आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकतो. यामुळे आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कलिंगड खराब न होता जास्त दिवस चांगले टिकून राहू शकते. परंतु यासाठी कलिंगड योग्य पद्धतीने स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवले पाहिजे, जेणेकरून ते खाण्यायोग्य राहील. पण, याचा अर्थ असा नाही की, कलिंगड कापून आठवडाभर तसेच फ्रिजमध्ये ठेवले आहे. कापलेले कलिंगड ३ ते ५ दिवसांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. 

कोथिंबिरीची हिरवीगार जुडी आणली, मग कोथिंबीर पुरीचा बेत तर हवाच, टी - टाईम स्नॅक्ससाठी टेस्टी पदार्थ...

फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट थालीपीठ, चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच खमंग...

अर्धवट कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये स्टोअर करण्याची योग्य पद्धत... 

१. कलिंगड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यासाठी, ते कापल्यानंतर कंटेनर किंवा फॉइलमध्ये गुंडाळून ठेवावे.

२. कापलेले टरबूज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यासाठी, रेफ्रिजरेटरचे तापमान ४०°F (४°C) असावे.

३. कलिंगड फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी, तुम्ही ते फूड ग्रेडेड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये देखील गुंडाळून ठेवू शकता. यामुळे त्यातून कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येणार नाही.

कोकणात करतात तशी पारंपरिक मसालेदार ग्रेव्हीवाली कच्च्या फणसाची भाजी, अस्सल गावरान चव...

कलिंगड दीर्घकाळ फ्रिजमध्ये स्टोअर करण्याचे तोटे... 

१. जर तुम्ही कापलेले कलिंगड ३ ते ५ दिवसांपेक्षा दीर्घकाळ फ्रिजमध्ये  ठेवले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

२. कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत.

३. कापलेले कलिंगड जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात आणि त्यातून विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो.

४. कलिंगड दीर्घकाळ फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास त्याच्या चवीतही फरक पडू शकतो.

टॅग्स :अन्नफळेसमर स्पेशलकिचन टिप्स